२ लाख शेतकºयांनी भरला विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:37 IST2017-07-29T00:37:26+5:302017-07-29T00:37:26+5:30

नांदेड: आॅनलाईनमध्ये येणाºया अडचणीवर मात करीत जिल्ह्यातील जवळपास २ लाख शेतकºयांनी पीक विमा भरल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. ३१ जुलै ही पीक विमा भरण्याची अंतिम तारीख आहे.

2-laakha-saetakaoyaannai-bharalaa-vaimaa | २ लाख शेतकºयांनी भरला विमा

२ लाख शेतकºयांनी भरला विमा

सुनील जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: आॅनलाईनमध्ये येणाºया अडचणीवर मात करीत जिल्ह्यातील जवळपास २ लाख शेतकºयांनी पीक विमा भरल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. ३१ जुलै ही पीक विमा भरण्याची अंतिम तारीख आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१७-१८ अंतर्गत खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा भरण्यासाठी शासनाने गावपातळीवर सीएससीच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिली़ बिगर कर्जदार शेतकºयांना अर्ज भरण्यास सुलभ व्हावे म्हणून कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) चा आधार घेण्यात आला़, परंतु इंटरनेट आणि आॅनलाईन सर्व्हरमध्ये वारंवार येणाºया तांत्रिक अडचणीमुळे सेवा फेल ठरली असून पुन्हा बँकांचा आधार घ्यावा लागत आहे़
पीक विमा कंपनीच्या सर्व्हरमधील तांत्रिक अडचणी आणि सेवा केंद्रामध्ये होणारी शेतकºयांची आर्थिक लूट यामुळे सदर उपक्रम अपयशी ठरला़ त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी ओळखीच्या बँकेत पीक विमा भरणे पसंत केले़, परंतु तेथेही तांत्रिक अडचणी, अपलोडसाठी लागणारा वेळ आदींचा सामना करावा लागत आहे़ जिल्ह्यातील १ हजार ७०० पैकी ८०० सीएससी केंद्रांवर पीक विमा स्वीकारला जात आहे़ परंतु, सीएससी केंद्रावर पीक विमा स्वीकारण्यासाठी ५०, १०० रूपये घेतले जात असल्याने अनेक शेतकºयांनी सेंटरकडे पाठ फिरविली़ परिणामी बँकांमधील गर्दीत मोठी वाढ झाली आहे़
दरम्यान, प्रत्येक तालुका, गावपातळीवर असलेल्या बँकांमध्ये शेतकºयांची गर्दी झाली़ तसेच पीक विमा स्वीकारत नसल्याने शेतकºयांनी देगलूर, भोकर येथे बँकांना टाळे ठोकले तर काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला़
शेतकºयांचा वाढता संताप लक्षात घेऊन सीएससीचे प्रकल्प व्यवस्थापक आणि जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी तसेच इतर राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवस्थापक यांची जिल्हा प्रशासनाने बैठक घेऊन पीक विमा भरण्यास येणाºया अडचणी तत्काळ दूर करण्याचे निर्देश दिले़ यानंतर बहुतांश बँकांनी पीक विमा भरण्यास सुरूवात केली़
आजघडीला सीएससी सेंटर, राष्ट्रीयीकृत बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वच शाखांमध्ये पीक विमा स्व्ीकारला जात आहे़ शेतकºयांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी हे जिल्हा अग्रणी बँकेचे जयंत वरणकर आणि सीएससीच्या प्रकल्प व्यवस्थापक यांच्याशी समन्वय ठेऊन आहेत़

Web Title: 2-laakha-saetakaoyaannai-bharalaa-vaimaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.