बीडमध्ये दोन धाडसी चोºया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:47 IST2017-09-17T00:47:51+5:302017-09-17T00:47:51+5:30
बीड शहरात चोºयांचे सत्र सुरूच असून शनिवारी पहाटे पुन्हा पत्रकारासह एका निवृत्त पोलीस अधिकाºयाच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारून लाखोंचा ऐवज लंपास केला.

बीडमध्ये दोन धाडसी चोºया
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड शहरात चोºयांचे सत्र सुरूच असून शनिवारी पहाटे पुन्हा पत्रकारासह एका निवृत्त पोलीस अधिकाºयाच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारून लाखोंचा ऐवज लंपास केला. पोलिसांनी पंचनामा केला. दरम्यान, चोºयांचे सत्र सुरूच असल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील बलभीम चौक भागात पत्रकार शेख मुजीब यांचे घर आहे. शेख यांच्या स्वयंपाक घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील रोख सव्वालाख रुपये आणि तीन मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. त्यानंतर चोरट्यांनी शेख यांच्या घरामागे राहणारे निवृत्त पोलीस अधिकारी विनायक गुळवळकर यांच्या घरी चोरी केली. गुळवळकर यांच्या घराचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांच्या घरात असणाºया कपाटातील भांडी व रोकड घेऊन चोरटे पसार झाले. हा सर्व प्रकार शनिवारी सकाळी हे सर्वजण झोपेतून उठल्यावर उघडकीस आला. त्यानंतर घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळाची पाहणी करून सर्व पंचनामा केला आहे. पथकांना पाचारणही केले होते.परंतु ठोस पुरावा हाती लागलेला नाही. एक संशयित ताब्यात घेतला आहे. आमचा तपास गतीने सुरू असल्याचे शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुलेमान सय्यद यांनी सांगितले.