मोकातील दोन टोळीप्रमुख गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:19 IST2017-10-14T00:19:52+5:302017-10-14T00:19:52+5:30

विविध गंभीर गुन्ह्यांत मोका लावलेल्या दोन टोळीप्रमुखांच्या गुरुवारी मध्यरात्री मुसक्या आवळण्यात आल्या

2 gang leaders arrested | मोकातील दोन टोळीप्रमुख गजाआड

मोकातील दोन टोळीप्रमुख गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : विविध गंभीर गुन्ह्यांत मोका लावलेल्या दोन टोळीप्रमुखांच्या गुरुवारी मध्यरात्री मुसक्या आवळण्यात आल्या. आठवले व काळे गटाच्या या म्होरक्यांना स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाने गजाआड केले. टोळीतील इतर गुन्हेगारांचा शोध सुरु असल्याचे पो. नि. घनश्याम पाळवदे यांनी सांगितले.
बीडमधील माळीवेस भागातील आठवले गटातील चौघांविरुद्ध मोका अंतर्गत तीन महिन्यांपूर्वी कारवाई करण्यात आली. यामध्ये टोळीतील सागर उर्फ विकी संतोष जाधव याला तात्काळ अटक केली होती, तर इतरांचा शोध सुरु होता. गुरुवारी टोळीप्रमुख अक्षय शामराव आठवले हा बीडमध्ये आल्याची माहिती दरोडा, गुन्हे शाखेला मिळाली. त्यांनी खात्री करुन रात्री ११.३० वाजता माळीवेस भागातील त्याच्या घराजवळ सापळा लावला. खात्री पटताच दरवाजा तोडून प्रवेश करीत त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई दरोडा प्रतिबंधकचे सपोनि श्रीकांत उबाळे, प्रकाश वक्ते, मुंजाबा सौंदरमल, श्रीमंत उबाळे, राजाभाऊ नागरगोजे, बबन राठोड, संजय खताळ, गणेश दुधाळ, भारत बंड, संघर्ष गोरे, बाळासाहेब सुरवसे, माया साबळे, नारायण साबळे यांनी केली.

Web Title: 2 gang leaders arrested