२ कोटी ६६ लाखांचा आराखडा
By Admin | Updated: August 11, 2014 01:54 IST2014-08-11T01:19:46+5:302014-08-11T01:54:35+5:30
गोकुळ भवरे, किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, किनवटने केंद्रवर्ती अर्थसंकल्प न्युक्लिअस बजेट अंतर्गत २०१४-१५ या वर्षाचा २ कोटी ६६ लाख ७० हजार रुपयाचा

२ कोटी ६६ लाखांचा आराखडा
गोकुळ भवरे, किनवट
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, किनवटने केंद्रवर्ती अर्थसंकल्प न्युक्लिअस बजेट अंतर्गत २०१४-१५ या वर्षाचा २ कोटी ६६ लाख ७० हजार रुपयाचा आराखडा मंजुरीसाठी पाठविला आहे. या आराखड्याचे वैशिष्ठ्ये म्हणजे शेतकऱ्यांच्या कल्याण्याच्या नव्या योजना घेतल्या आहेत.
महाराष्ट्र राज्यात निरनिराळ्या क्षेत्रात राहणाऱ्या विविध आदिवासी जमातीच्या विकासाच्या प्रगतीमध्ये ठिक-ठिकाणी तफावत आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील विकास कार्यक्रमाच्या गरजाही भिन्न आहेत. त्यामुळे प्रकल्प कार्यालयामार्फत राबवावयाची कर्जविरहीत केंद्रवर्ती अर्थ संकल्प न्यूक्लिअस बजेट योजना आहे. दरवर्षी या योजने अंतर्गत उत्पन्न निर्मित व वाढीच्या, मानव साधनसंपती विकासाच्या योजना लोकवाटा सहभागातून तर प्रशिक्षणाच्या विना लोकवाटा सहभागातून राबवल्या जाते. यावर्षी आदिवासी शेतकऱ्यांसाठी शेतात बोअर मारुन घेणे, शेताला तार कंपाऊंड करणे, पेट्रोल, स्प्रेपंप ह्या नवीन योजना घेतल्या आहेत.
मानव साधन संपत्ती विकासाच्या योजनेसाठी १ लाख ५ हजार रुपये लोकवाटा सहभाग असणार असून ५० लाख २० हजार रुपये शासनाचा सहभाग असणार आहे. एकूण ५१ लाख २५ हजार रुपये प्रस्तावित आहेत. प्रशिक्षणाच्या योजनेसाठी १४ लाख ६० हजार रुपये प्रस्तावित आहेत. ८५ टक्के अनुदानावर ५१० आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्न निर्मिती व वाढीच्या योजना २०१४-१५ वर्षात प्रस्तावित आहेत. मानवी साधन संपत्ती व विकासाच्या योजनेत गोडवन उपजसाठी पाच गावे मासेमारी समितीसाठी तीन गांवे प्रस्तावित आहेत. प्रकल्पातील १७ आदिवासी आश्रम शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी मधील शिक्षक व विद्यार्थ्यांना वाचन लेखन गणित इत्यादी प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहेत. प्रकल्पस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष प्रा. विजय खुपसे,प्रकल्प अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आराखडा तयार केला आहे़