कुकरी घेऊन दहशत पसरविणारे दोघे जेरबंद; तडीपारही अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:27 IST2017-10-17T01:27:44+5:302017-10-17T01:27:44+5:30

हातात कुकरी घेऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणा-या दोन युवकांना शिवाजीनगर पोलिसांच्या पथकाने शस्त्रासह जेरबंद केले.

2 criminals with weapons arrested | कुकरी घेऊन दहशत पसरविणारे दोघे जेरबंद; तडीपारही अटक

कुकरी घेऊन दहशत पसरविणारे दोघे जेरबंद; तडीपारही अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : हातात कुकरी घेऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणा-या दोन युवकांना शिवाजीनगर पोलिसांच्या पथकाने शस्त्रासह जेरबंद केले. सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या परिसरातील रस्त्यावर शिवाजीनगर ठाण्याच्या पोलिसांची गस्त सुरु होती. दरम्यान, दोन युवक संशयितरीत्या जात असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्याकडे कुकरी आढळून आली. पोलिसांनी शेख अमीर शेख समी (रा. बालेपीर) आणि स. अन्वर उर्फ कालू मुनावत सय्यद (रा. खासबाग) यांना अटक करण्यात आली.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अमोल धस, पोना विठ्ठल देशमुख, राहुल शिंदे, महेश चव्हाण, गणेश नवले, विजय पवार, राजू वंजारे आदींनी ही कारवाई केली. एएसआय हरिश्चंद्र गिरी यांच्या फिर्यादीवरुन शस्त्र कायद्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारी देशमुख, शिंदे, चव्हाण, वंजारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: 2 criminals with weapons arrested