१९ जागांसाठी १९८ अर्ज दाखल

By Admin | Updated: April 9, 2015 00:14 IST2015-04-08T23:50:20+5:302015-04-09T00:14:57+5:30

बीड : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते व त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत रिंगणात उतरल्यानंतर बुधवारी,

198 applications for 19 seats | १९ जागांसाठी १९८ अर्ज दाखल

१९ जागांसाठी १९८ अर्ज दाखल


बीड : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते व त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत रिंगणात उतरल्यानंतर बुधवारी, शेवटच्या दिवशी भाजपा नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. १९ जागांसाठी १९८ अर्ज दाखल झाले असून आज, गुरुवारी छाननी झाल्यानंतर काही उमेदवार निवडणूकीच्या बाहेर पडतील. तसेच २४ एप्रिल रोजी अर्ज माघारी घेण्याची तारीख असल्याने त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हा बँक ताब्यात असताना काहींनी त्याचा दुरपयोग करुन कोट्यावधींचे कर्ज लाटले. या प्रकरणी मधल्या काळात भाजपा व राष्ट्रवादीच्या सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. सहकार कायद्यातील नवीन तरतुदीनुसार एखाद्या सहकारी संस्थेचे मंडळ बरखास्त झाले तर संबंधीत व्यक्तींना पुढील सहा वर्ष निवडणूक लढविता येणार नाही.
यामुळे राष्ट्रवादी व भाजपाच्या दिग्गजांसमोर पेच निर्माण झाला होता. त्यावर मुलगा किंवा नातेवाईक हा पर्याय काढण्यात आला आहे. त्यामुळे दिग्गजांचे मुले व नातेवाईक निवडणूकीमध्ये उतरले आहेत.
तीन तालुक्यातील
अर्ज बुधवारी दाखल
अर्ज स्वीकृतीस सुरुवात झाल्यापासून धारुर, केज व अंबाजोगाई तालुक्यातून एकही अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास मंगळवारपर्यंत प्राप्त झाला नव्हता मात्र बुधवारी या तिन्ही तालुक्यातून अर्ज दाखल झाले आहेत. केज तालुक्यातील ऋषीकेश आडसकर, ज्ञानोबा गायकवाड, निर्मल गालंडे, रामहरी मेटे, संतोष हंगे बजरंग सोनवणे व नंदाबाई दराडे यांनी अर्ज दाखल केले आहेत. धारुर तालुक्यातून गोरख धुमाळ, नागोबा चोले, पदमीन शिनगारे, महेश सोळंके, संगिता सोळंके तर अंबाजोगाई तालुक्यातून वसंत आगळे, अविनाश लोमटे, दत्तात्रय पाटील, अमोल कदम, बालासाहेब चव्हाण व चंद्रकांत चाटे यांनी सोसायटी मतदार संघातून अर्ज दाखल केले आहेत.
मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडीत यांनी आपला अर्ज दाखल केला होता. त्या पाठोपाठ भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी अर्ज दाखल केले असल्याने डीसीसीच्या निवडणूकीत रंगत येणार आहे. अनुसूचित जाती/जमातीमधून दिलीप भोसले, संजय दौंड, महादेव सदाफुले, विठ्ठल जोगदंड, अतूल गायकवाड, कैलास कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे यांनी बुधवारी अर्ज दाखल केले आहेत. इतर मागास वर्गातून दिशेन परदेशी, सुर्यकांत खेत्रे, शेख अमर, कल्याण आखाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महिला प्रर्गातून शोभा साबळे, सुषमा थोरात, सत्यभामा बांगर, जयश्री मस्के, सारीका पोकळे, उस्मान बेगम, लताबाई मिसाळ, मगंल मोरे यांनी अर्ज दाखल केले. सोसायटी मतदार संघातून सर्जेराव तांदळे, सुजीत पडूळे, शहादेव टेकाळे यांनी अर्ज दाखल केले. कृषी पणनमधून रामदास खाडे, मोहन राख, अर्जुन वडे, बबन जगताप, नवनाथ उबाळे, विश्वास पाटील, इतर शेती संस्थामधुन महादेव तोंडे, तुलसबाई खाडे, कैलास शेजाळ, विष्णू जायभाय, संभाजी पंडीत, दिलीप करपे, लक्ष्मण लटपटे, सतिश देशपांडे, योगेश शेळके शकुंतला फड, शिवाजी मोटे व विजय सानप यांचे अर्ज आहेत. पतसंस्था मतदार संघातून दीपक घुमरे नशीब आजमावत आहेत. (प्रतिनिधी)
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नामनिर्देशन स्वीकृतीस ८ एप्रिलपासून सुरूवात झाली. छाननी ९ एप्रिल रोजी होणार आहेत. अर्ज मागे घेण्याची तारीख २४ एप्रिल आहे. १९ जागेसाठी ५ मे रोजी मतदान होईल तर ७ मे रोजी मतमोजणी होणार आहे. सोसायटी व मतदार असे मिळून एकुण १ हजार ४२४ मतदार मतदान करणार आहेत. दरम्यान, मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: 198 applications for 19 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.