वर्षभरात १९४ जणांचा एड्समुळे झाला मृत्यू
By Admin | Updated: December 1, 2014 00:50 IST2014-12-01T00:38:12+5:302014-12-01T00:50:09+5:30
लातूर : एड्सचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून, अनेकजण या रोगाला बळी जात आहेत़ गेल्या वर्षभरात १९४ जणांचा या रोगाने मृत्यू झाला असून

वर्षभरात १९४ जणांचा एड्समुळे झाला मृत्यू
लातूर : एड्सचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून, अनेकजण या रोगाला बळी जात आहेत़ गेल्या वर्षभरात १९४ जणांचा या रोगाने मृत्यू झाला असून, सध्या सर्वोपचार रुग्णालयातील एआरटी सेंटरमध्ये ८ हजार ६४४ रुग्ण उपचार घेत आहेत़ २००७ पासून आजतागायत ११०७ लोकांचा या रोगाने बळी घेतला आहे़
सर्वोपचार रुग्णालयात एड्स एचआयव्ही बाधीत रुग्ण तपासणी २००२ पासून सुरु झाली आहे़ २००२ ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत २ लाख ७५ हजार ८९५ सामान्य व्यक्तींचे समुपदेश व चाचणी करण्यात आली आहे़ त्यापैकी १२ हजार ४०९ व्यक्ती एचआयव्ही बाधीत आहेत़ यापैकी ८ हजार ६४४ व्यक्तींना सर्वोपचार रुग्णालयातील एआरटी सेंटरमध्ये औषोधोपचार करण्यात येत आहेत़ २००२ ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत २ लाख ३७ हजार ४५४ गर्भवती मातांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली आहे़ यापैकी ६२१ माता एचआयव्ही बाधीत असल्याचे आढळून आले आहे़ फेब्रुवारी २०१४ पासून पीपीटीसीटी मल्टी ड्रग रेजमिन उपचारातंर्गत प्रत्येक गर्भवती मातेस एआरटी औषोधोपचार सुरु करण्यात आला आहे़ या औषोधोपचारामुळे संसर्गित मातेपासून जन्माला येणाऱ्या बालकास एचआयव्ही संसर्ग होण्याचा धोका पूर्णपणे थांबविण्यात यश येत आहे़ जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य व उपकेंद्र स्तरावर एचआयव्ही तपासणी सुविधा कार्यरत आहे़ लवकरात लवकर निदान करुन औषोधोपचार सुरु करण्यासाठी तपासणी करण्यात येते़ गर्भवती मातेचे महत्व लक्षात घेऊन एकही गर्भवती माता एचआयव्ही तपासणीपासून सुटणार नाही याची खबरदारी घेतली आहे़ तसेच एचआयव्ही संसर्गित मातेपासून जन्माला येणाऱ्या बालकांचे लवकरात लवकर निदान करण्यासाठी आयसीटीसी केंद्र लातूर, औसा, निलंगा, अहमदपूर येथे कार्यरत आहेत़ या केंद्रामध्ये संसर्गित मातेपासून जन्माला आलेल्या बालकांची (६ आठवडे, ६ महिने, १२ महिने व १८ महिने) पूर्ण झाल्यानंतर तपासणी केली जाते़ उपचाराबाबत शासकीय आरोग्य संस्थांनी काळजी घेतल्यामुळे तसेच संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़बी़एसक़ोरे यांनी दिली़ (प्रतिनिधी)४
२०१० मध्ये ३४ हजार २०२ सामान्य व्यक्तींची तपासणी; त्यात १५९९ व्यक्तींना एचआयव्ही संसर्ग, २०११ मध्ये ३५९०७ व्यक्तींची तपासणी त्यापैकी ११४२ जण एचआयव्हीबाधित, २०१२ मध्ये ३९७२४ व्यक्तींची तपासणी, पैकी १०३४ व्यक्तींना एचआयव्हीची लागण, २०१३ मध्ये ४५३६४ पैकी ९२० जणांना लागण २०१४ मध्ये ५१७७५ पैकी ७८४ जणांना एचआयव्हीची बाधा.