पॅरोलवर सुटलेले १९ कैदी फरार

By Admin | Updated: August 13, 2014 01:05 IST2014-08-13T00:37:18+5:302014-08-13T01:05:43+5:30

बीड : वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात कैद असलेले १९ जण पॅरोलवर बाहेर आले़ मात्र मुदतीत ते पुन्हा कारागृहात परतले नाहीत़ त्यामुळे पोलिसांनी त्यांची

19 prisoners absconding on parole | पॅरोलवर सुटलेले १९ कैदी फरार

पॅरोलवर सुटलेले १९ कैदी फरार




बीड : वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात कैद असलेले १९ जण पॅरोलवर बाहेर आले़ मात्र मुदतीत ते पुन्हा कारागृहात परतले नाहीत़ त्यामुळे पोलिसांनी त्यांची शोधाशोध सुरु केली आहे़ मंगळवारी अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी माहिती कळविणाऱ्याला प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे़
खून, दरोडे, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यातील कैद्यांचा यात समावेश आहे़ २००६ ते २०१४ या कालावधीतील १६ कैदी नाशिक रोड कारागृहात तर उर्वरित तीन औरंगाबाद कारागृहात कैद होते़ त्यांना वेगवेगळ्या तारखेत पॅरोलवर सुटी मंजूर झाली़ साधारणत: महिनाभराची सुटी मिळाली होती़ कारागृहातून बाहेर आलेल्या या कैद्यांनी दिलेल्या मुदतीत पुन्हा कारागृहात न जाता फरार होणे पसंत केले़ त्यामुळे आता पोलिसांनी त्याची शोध मोहीम हाती घेतली आहे़ मात्र अनेक वर्षांपासून ते सापडत नसल्याने आता त्यांच्यावर प्रत्येकी हजार रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे़ माहिती कळविणाऱ्यांना हे बक्षीस दिले जाणार असून नावेही गुप्त ठेवली जाणार आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सी़ डी़ शेवगण यांनी दिली आहे़
या कैद्यांचा समावेश
माजेद उर्फ नायर खुशीद काझी रा़ आर्यगल्ली धारुर, ज्ञानेश्वर मुकुंदराव लाड रा़ पांगरी कॅम्प परळी, अर्जून शंकर कांबळे रा़ भीमनगर गेवराई, शे़ बिलाल शे़ अब्दुल रज्जाक रा़ गणेशपार परळी, दिलीप बब्रुवान गिरी रा़ सोमनाथ बोरगाव ता़ अंबाजोगाई, शंकर विठ्ठल काळे रा़ देवपिंप्री ता़ गेवराई, लक्ष्मण भीमराव काळे रा़ बनसारोळा ता़ केज, शे़ मतीन शे़ निजाम रा़ भाटआंतरवली ता़ गेवराई गोरख मुसा मुरकुटे रा़ शनिमंदिराजवळ आष्टी, दत्ता वामन जवंजाळ रा़ म्हाळसजवळा ता़ बीड, जगदीश बन्सु खारवर रा़ नागसेन नगर अंबाजोगाई, नंदकिशोर फुलचंद राठी रा़ गणेशपार परळी, संतोष साहेबराव नागरगोजे रा़ पंचशीलनगर परळी, मोहन विश्वनाथ कांबळे रा़ घाटनांदूर ता़ अंबाजोगाई, महादेव कचरु तट रा़ धारुर, रईसोद्दीन बद्रोद्दीन काझी रा़ जुनी तहसील कमवाडा बीड, शे़ जब्बार शे़ सत्तार रा़ महंमदिया कॉलनी बीड, भागवत आश्रुबा नरवडे रा़ जोडहिंगणी ता़ धारुर, सय्यद खालेद स़ रियासत रा़ आझादनगर परळी (प्रतिनिधी)

Web Title: 19 prisoners absconding on parole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.