जिल्हा परिषदेसाठी १८५ तर पंचायत समितीसाठी ३०२ उमेदवारांची माघार
By Admin | Updated: February 7, 2017 22:26 IST2017-02-07T22:25:31+5:302017-02-07T22:26:19+5:30
लातूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम उमेदवार स्पष्ट झाले

जिल्हा परिषदेसाठी १८५ तर पंचायत समितीसाठी ३०२ उमेदवारांची माघार
लातूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम उमेदवार स्पष्ट झाले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी १८५ तर पंचायत समितीसाठी ३०२ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात जिल्हा परिषदेसाठी २३० तर पंचायत समितीसाठी ४१९ उमेदवार रिंगणात आहेत़ जिल्हा परिषदेसाठी ४१५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता़ त्यापैकी १८५ जणांनी माघार घेतल्याने आता निवडणुकीत २३० उमेदवार मैदानात आहेत़ तर पंचायत समितीच्या ७२१ उमेदवारांचे अर्ज वैध झाले होते़ त्यापैकी ३०२ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता मैदानात ४१९ उमेदवार आहेत़ (वृत्त हॅलो २ वर) जिल्हा परिषदेसाठी २३० तर पंचायत समितीसाठी ४१९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ लातूर तालुक्यात जि़प़तून १५ उमेदवारांनी माघार घेतली असून, पं़स़त २९ उमेदवारांची माघार आहे़ औसा तालुक्यात जि़प़ गटातून ४२ तर पं़स़ गणातून ६९ जण, रेणापूर तालुक्यात जि़पग़टात ११ तर पं़सग़णात २७, उदगीर तालुक्यात जि़पग़टात २२, पं़ स़ गणात २४, अहमदपूर तालुक्यात जि़पग़टात २३ आणि पं़सग़टात ३६, चाकूर तालुक्यात जि़पग़टात २०, पं़स़ गणात ३२, जळकोट तालुक्यात जि़पग़टात ११, पं़सग़णात १२, निलंगा तालुक्यात जि़पग़टात २७, पं़स़ गणात ४७, देवणी तालुक्यात जि़पग़टात १०, पं़सग़णात २१, शिरूर अनंतपाळ तालुक्यात जि़प़ गटात १० आणि पं़स़ गणात ५ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे़ लातूर तालुक्यात जि़पग़टात आता ४७ उमेदवार असून, औसा ४४, रेणापूर ११, उदगीर २७, अहमदपूर २३ असे उमेदवार आहेत़