स्वेच्छा सेवानिवृत्ती योजनेत १८० दिवसांचा लाभ द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:02 IST2020-12-28T04:02:01+5:302020-12-28T04:02:01+5:30

-------------- बालाजीनगरात रस्त्यावरच वाहने औरंगाबाद : मोंढा नाका ते बालाजीनगर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. ...

180 days benefit should be given in voluntary retirement plan | स्वेच्छा सेवानिवृत्ती योजनेत १८० दिवसांचा लाभ द्यावा

स्वेच्छा सेवानिवृत्ती योजनेत १८० दिवसांचा लाभ द्यावा

--------------

बालाजीनगरात रस्त्यावरच वाहने

औरंगाबाद : मोंढा नाका ते बालाजीनगर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावरच दुचाकी, चारचाकी वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर वाहन उभे करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

--------------

माती, मुरुमाने बुजविले रस्त्यावरील खड्डे

औरंगाबाद : त्रिमूर्ती चौक ते आकाशवाणी चौक रस्त्यावरील खड्डे माती आणि मुरूम टाकून बुजविण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेकडे डांबर, खडी नाही का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

-------------

डीपीला वेलींचा विळखा,

संरक्षक जाळीचा अभाव

औरंगाबाद : शहरातील बुद्धनगर रस्त्यावरील विद्युत डीपीला सध्या वेलींचा विळखा पडला आहे. शिवाय या डीपीला संरक्षक जाळी नाही. याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. वेली हटवून डीपीला संरक्षक जाळी बसविण्याची मागणी होत आहे.

बसस्थानकासमोरील

दादऱ्यावर वाढल्या वेली

औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकासमोरील दादऱ्याची सध्या पार दुरवस्था झाली आहे. या दादऱ्यावर मोठ्या प्रमाणात वेली वाढल्या आहेत. दादऱ्याच्या देखभाल-दुरुस्तीकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या दादऱ्यावरून ये-जा करण्याचेही टाळले जात आहे.

Web Title: 180 days benefit should be given in voluntary retirement plan