कवितेच्या पाडव्याला १८ वर्षांची परंपरा!
By Admin | Updated: April 7, 2016 00:18 IST2016-04-06T23:59:50+5:302016-04-07T00:18:14+5:30
जालना : कै. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट व ‘उर्मी’ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या कवितेचा पाडवा कार्यक्रमाला अठरा वर्षांची परंपरा लाभली आहे.

कवितेच्या पाडव्याला १८ वर्षांची परंपरा!
जालना : कै. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट व ‘उर्मी’ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या कवितेचा पाडवा कार्यक्रमाला अठरा वर्षांची परंपरा लाभली आहे. याच कार्यक्रमात प्रसिद्ध उर्दू शायर राय हरिश्चंद्र साहनी दु:खी राज्य काव्य पुरस्काराचे वितरण केले जाते. राज्यातील अठरा मान्यवरांना आतापर्यंत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राज्यस्तरावर दिला जाणाऱ्या या पुरस्काराला वलय प्राप्त झाल्याने याचे महत्त्व यानिमित्ताने अधोरेखित होते.
व्यापारी शहर असलेल्या जालन्यात साहित्यिक व सांस्कृतिक चळवळ गतीमान व्हावी, या उद्देशाने उर्मीचे संपादक तथा ज्येष्ठ कवि जयराम खेडेकर, कार्यकारी संपादक डॉ. संजीवनी तडेगावकर, कै. नंदकुमार साहनी चॅरिटेबल ट्रस्टचे नवल साहनी आणि विनीत साहनी यांनी १९९८ मध्ये कवितेचा पाडवा सुरु केला. तो आजतागायत अव्याहतपणे सुरुच आहे. या कार्यक्रमामुळे चैतन्यमय वातावरण निर्मिती तसेच नवीकवींना प्रोत्साहन मिळाले आहे. एकूणच कवितेचा उत्सव साजरा करण्याची परंपरा यानिमित्ताने सुरु झाली
आहे.
गत अठरा वर्षांमध्ये पुरुषोत्तम पाटील, गजमल माळी, ना.धों. महानोर, गंगाधर पानतावणे, विठ्ठल वाघ, विजया राजाध्यक्ष, भालचंद्र नेमाडे, वसंत आबाजी डहाके, राजन गवस, गो.मा. पवार, प्रभाकर बागले, ना.धों. महानोर, उत्तम कांबळे, सतीश काळसेकर, भगवान देशमुख, सदानंद देशमुख, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, चंद्रमोहन कुलकर्णी या मान्यवरांनी कवितेचा पाडवा कार्यक्रमात हजेरी लावलेली आहे. कवी आणि कवितेच्या सन्मानासाठी १८ वर्षांपासून कवितेचा पाडवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. (प्रतिनिधी)