१८ गावांना ‘क’पर्यटन तीर्थक्षेत्र दर्जा
By Admin | Updated: July 22, 2014 00:18 IST2014-07-21T23:39:25+5:302014-07-22T00:18:35+5:30
हिमायतनगर : महाराष्ट्र पर्यटन मंत्रालयाकडून हिमायतनगर तालुक्यातील ७ गावांना आणि हदगाव तालुक्यातील ११ गावांना ‘क’ पर्यटन तीर्थक्षेत्रात दर्जा प्राप्त झाला आहे़

१८ गावांना ‘क’पर्यटन तीर्थक्षेत्र दर्जा
हिमायतनगर : महाराष्ट्र पर्यटन मंत्रालयाकडून हिमायतनगर तालुक्यातील ७ गावांना आणि हदगाव तालुक्यातील ११ गावांना ‘क’ पर्यटन तीर्थक्षेत्रात दर्जा प्राप्त झाला आहे़ गेल्या चार वर्षांत दोन्ही तालुक्यांतील १० तीर्थक्षेत्र गावांना ३ कोटी ३५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे़ त्यापैकी ९० टक्के कामे पूर्ण झाली असून १० टक्के कामे होणार आहेत़
हिमायतनगर तालुक्यातील गावे -परमेश्वर मंदिर हिमायतनगर, हनुमान मंदिर बोरगडी, सिद्धेश्वर मंदिर दाबदरी, सैलानी दर्गा जवळगाव, महादेव मंदिर दरेगाव, सातशिव मंदिर वटफळी, हराळेश्वर मंदिर दूधड़ हदगाव तालुक्यातील गावे- महादेव मंदिर केदारगुडा, हनुमान मंदिर मानवाडी आंबाळा, दत्तबडी हदगाव, दत्तमंदिर पिंपळगाव वाणी, महादेव मंदिर खरटवाडी, महादेव मंदिर तामसा बारालिंग, बौद्धविहार वारकवाडी, बसवेश्वर मंदिर येवली, आडीच लिंगेश्वर मंदिर यवली, बौद्ध धर्म केंद्र भदंत टेकडी लोहा, खंडेराय गड, करोडी मंदिऱ हिमायतनगर तालुक्यातील परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय, बसस्थानक मैदान काँक्रेटीकरण व रस्ते १ कोटी २५ लाखांची कामे पूर्ण झाली़ ४० लाख रुपये हनुमान मंदिर बोरगडी कामे पूर्ण, १५ लाख रुपये सिद्धेश्वर मंदिर सभागृहासाठी निधी मंजूर, सातशिव मंदिर वटफळी येथे १० लाखांचे सभागृह असे १ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर होवून कामे पूर्णत्वाकडे आहेत़ हदगाव तालुक्यातील केदारगुडा महादेव मंदिरासाठी ६० लाख, दत्तमंदिर पिंपळगाव देवस्थान २३ लाखांची संरक्षक भिंत, महादेव मंदिर खरटवाडीसाठी ५ लाखांचे सभागृह, तामसा बारालिंग महादेव मंदिर डांबरी रस्ता २३ लाख, अडीच लाख रुपये लिंगेश्वर मंदिर सिबदरा २५ लाख, करोडी मंदिरसाठी १० लाख असे १ कोटी ४५ लाखांचा निधी मंजूर झाला़ (वार्ताहर)