१८ हजार विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

By Admin | Updated: June 19, 2014 00:17 IST2014-06-18T23:50:52+5:302014-06-19T00:17:56+5:30

विलास चव्हाण, परभणी दहावीचा निकाल घोषित झाला अन् विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची ओढ लागली असून जिल्ह्यातील २१३ महाविद्यालयांत एकूण १८ हजार ६४ विद्यार्थ्यांना

18 thousand students will get admission | १८ हजार विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

१८ हजार विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

विलास चव्हाण, परभणी
दहावीचा निकाल घोषित झाला अन् विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची ओढ लागली असून जिल्ह्यातील २१३ महाविद्यालयांत एकूण १८ हजार ६४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी आर.बी.गिरी यांनी दिली.
दहावीचा निकाल जाहीर झाला असून आपल्या पाल्याच्या महाविद्यालय प्रवेशासाठी नियोजन करीत आहेत़ शाळेचा दाखला व कागदपत्र जमवाजमव करण्यासाठी पालक व विद्यार्थी धावपळ करीत असल्याचे दिसत आहे. कला, वाणिज्य व विज्ञान या शाखेतील नामांकित महाविद्यालयांत आपल्या पाल्याला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धडपड सुरु झाली आहे. तालुक्यातील अनुदानित, अंशत: अनुदानित, विना अनुदानित महाविद्यालयाची तालुकानिहाय संख्या पुढील प्रमाणे- परभणी तालुका ५७, पूर्णा २६, सेलू १६, मानवत ११, पाथरी १७, गंगाखेड २८, पालम २०, सोनपेठ १३, जिंतूर २६ असे एकूण २१३ महाविद्यालय आहेत. यावर्षी जिल्ह्याचा ७९.१६ टक्के निकाल लागला असून बहुतेक विद्यार्थ्यांचा कल हा विज्ञान शाखेकडे आहे़ मागील दोन वर्षापासून वाणिज्य शाखेत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे़ परंतु कला शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी आहे़ त्याचबरोबर तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षणाकडेही विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे़

विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही
दहावीच्या परीक्षेत एकूण २२ हजार ८८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १८ हजार ६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी आर.बी.गिरी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
५० विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन
मानव विकास मिशनअंतर्गत तालुक्यातील ५० होतकरु विद्यार्थ्यांना निवडून त्यांना विशेष मार्गदर्शन करण्याची योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये महाविद्यालयात शिकवणी वर्ग, सीईटी आदी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी एस.पी.सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग राबविणार आहे़

Web Title: 18 thousand students will get admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.