१८ हजार विद्यार्थ्यांनी दिली प्रज्ञाशोध परीक्षा
By Admin | Updated: January 30, 2016 00:20 IST2016-01-30T00:05:42+5:302016-01-30T00:20:44+5:30
जालना : जालना आणि बुलडाणा जिल्ह्यातील १०८ परीक्षा केंद्रावर सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांनी जालना प्रज्ञाशोध परीक्षा दिली. जालना येथील जेईएस महाविद्यालय आणि

१८ हजार विद्यार्थ्यांनी दिली प्रज्ञाशोध परीक्षा
जालना : जालना आणि बुलडाणा जिल्ह्यातील १०८ परीक्षा केंद्रावर सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांनी जालना प्रज्ञाशोध परीक्षा दिली.
जालना येथील जेईएस महाविद्यालय आणि रोटरी क्लब आॅफ जालना यांच्या वतीने दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते. यंदाचे नववे वर्ष होते. या परीक्षेच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या गणित, विज्ञान, इतिहास नागरिक शास्त्राबरोबर सामान्य ज्ञान व बुद्धीमापन चाचणीवर परीक्षा होते.या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी हा या मागचा उद्देश आहे. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील स्पर्धा परीक्षेच्या धरतीवर या परीक्षेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. यावर्षी प्रत्येक केंद्रावर महाविद्यालयाच्या वतीने बहिस्थ परीक्षक नियुक्त करण्यात आले होते. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ओएमआर स्वरूपाची उत्तरपत्रिका देण्यात आली होती. या उत्तरपत्रिका संपूर्णपणे संगणकाद्वारे तपासण्यात येणार आहेत. यावर्षी अनेक विद्यार्थी दुष्काळामुळे परीक्षा फीस देऊ शकत नसल्याने त्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या विनंतीनुसार दहा टक्के विद्यार्थ्यांना निशुल्क बसविण्यात आले होते. परीक्षेसाठी जेईएस महाविद्यालयातील प्राध्यापक आणि रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.