१८ हजार ग्राहकांनी भरले २.९१ कोटी
By Admin | Updated: August 22, 2014 00:22 IST2014-08-22T00:02:45+5:302014-08-22T00:22:21+5:30
नांदेड : महावितरणच्या नांदेड परिमंडलात आॅनलाईन वीज बिल भरण्याच्या प्रणालीत वीज ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे.

१८ हजार ग्राहकांनी भरले २.९१ कोटी
नांदेड : महावितरणच्या नांदेड परिमंडलात आॅनलाईन वीज बिल भरण्याच्या प्रणालीत वीज ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
जुलै २०१४ या महिन्यात आॅनलाईनद्वारे १७९९६ ग्राहकांनी २ कोटी ९१ लाख ४ हजार १५० रुपयांचा भरणा केला. वीज बिल भरण्यात नांदेड जिल्हा आघाडीवर आॅनलाईन वीज बिल भरण्यासाठी महावितरणच्या यंत्रणेत प्रत्येक महिन्यास आॅनलाईन ग्राहकांची वाढ होत आहे. फेब्रुवारी २०१४ च्या तुलनेत जुलै २०१४ मध्ये अशा ग्राहकांची संख्या सुमारे ३ हजारांनी वाढली आहे.
मागील सहा महिन्यांत आॅनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा आढावा घेतला असता दर महिन्याला अशा ग्राहकांत मोठी वाढ होत आहे. फेब्रुवारी २०१३ मध्ये नांदेड परिमंडलाचे १४ हजार ११० आॅनलाईन वीज बिल भरणारे ग्राहक होते. मार्च २०१४ मध्ये त्यांची संख्या १५ हजार २६० वर गेली. एप्रिल २०१४ मध्ये १५ हजार ६९ ग्राहकांनी तर मे २०१४ मध्ये १५ हजार ६५६, जून महिन्यात १७ हजार ९४६ ग्राहकांनी आॅनलाईन प्रणालीद्वारे वीज बिल भरले तर जुलै २०१४ मध्ये १७ हजार ९९६ ग्राहकांनी वीज बिल आॅनलाईन प्रणालीद्वारे भरले आहे.
आॅनलाईन प्रणाली मार्फत वीज बिल भरण्यासाठी महावितरणच्या संकेत स्थळावर जावून ग्राहकांना आॅनलाईन वीज बिल भरता येते. ही वीज बिल भरण्यासाठी देशातील प्रमुख व राष्ट्रीयकृत बँकांचे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, मास्ट्रो कार्ड यांच्यासह नेट बॅकींग सेवेचाही वापर करता येतो. या प्रणालीमार्फत वीज बिल भरल्यास ग्राहकांना रांगेत उभे न राहता वेळेची बचत करता येते. कमी वेळात आणि श्रमात वीज बिल भरण्याच्या या प्रक्रियेचा ग्राहकांनी विशेषत: ग्रामीण भागातील ग्राहकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. नांदेड परिमंडळात नांदेड, परभणी आणि हिंगोली या तिन्ही जिल्ह्याच्या ठिकाणी महावितरणने ग्राहकांना केव्हाही वीज बिल भरता यावे, यासाठी एटीपी मशीन उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सर्व आधुनिक प्रणालीचा वापर ग्राहकांनी करावा. त्यातून आपला वेळ, श्रम आणि पैशाची बचत करावी, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता आर. जी. शेख यांनी केले आहे. (प्रतिनिधी)