१८ औषध दुकानांचे परवाने रद्द
By Admin | Updated: April 12, 2016 00:30 IST2016-04-12T00:25:31+5:302016-04-12T00:30:16+5:30
उस्मानाबाद : येथील औषध प्रशासन विभागाने मागील वर्षभराच्या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८३ औषध विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती़

१८ औषध दुकानांचे परवाने रद्द
उस्मानाबाद : येथील औषध प्रशासन विभागाने मागील वर्षभराच्या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८३ औषध विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती़ यातील १८ जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत़ तर ७४ जणांवर काही कालावधीकरिता परवाने निलंबनाची करण्यात आली आहे़ तर एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
जिल्ह्यात ६०७ किरकोळ औषध विक्रेते असून, १३२ ठोक विक्रेते आहेत़ ठोक विक्रेत्यांसह औषध दुकानांची तपासणी करणे, औषधांचे नमुने घेणे, फार्मासिस्टची उपस्थिती असणे, नियमांच्या उल्लंघनानंतर कारवाई करण्याचे काम येथील औषध प्रशासन विभागाकडून करण्यात येते़ या विभागाने एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या वर्षभराच्या जिल्ह्यातील ३२० औषध विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी केली आहे़ यातील ८३ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती़ यात फार्मासिस्ट नसणे, विना बिले औषधांची विक्री करणे, बिले सादर न करणे, जागा कमी असणे आदी विविध कारणांखाली या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या़ यातील ६४ औषध विक्रेत्यांचे परवाने काही दिवसांसाठी निलंबीत करण्यात आले होते़ तर १८ जणांचे औषधविक्रीचे परवाने रद्द करण्यात आले होते़ तर एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय काळे, औषध निरीक्षक सुनिल गवळी यांनी केली़ (प्रतिनिधी)