शिष्यवृत्तीचे १८ कोटी जमा

By Admin | Updated: June 8, 2014 00:56 IST2014-06-08T00:44:24+5:302014-06-08T00:56:43+5:30

जालना : जिल्ह्यातील कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमाच्या १९ हजार ६८२ विद्यार्थ्यांच्या खात्यात १८ कोटी ५ लाख ९५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती आॅनलाईन जमा झाली आहे.

18 crores of scholarships | शिष्यवृत्तीचे १८ कोटी जमा

शिष्यवृत्तीचे १८ कोटी जमा

जालना : भारत सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत जिल्ह्यातील कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमाच्या १९ हजार ६८२ विद्यार्थ्यांच्या खात्यात १८ कोटी ५ लाख ९५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती आॅनलाईन जमा झाली आहे.
कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी, डी.एड., बी. एड. अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयातील एस. सी., ओबीसी, व्हीजेएनटी, आणि एसबीसी आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विशेष समाजकल्याण उपायुक्त कार्यालयामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते.
आॅनलाईन शिष्यवृत्ती अर्ज संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मंजूर करून विशेष समाजकल्याण विभागाकडे पाठविले जातात.
चालू शैक्षणिक वर्षात एस.सी. प्रवर्गातील ५ हजार ६४७ , ओबीसी प्रवर्गातील ५ हजार ७०८ , एसबीसी प्रवर्गातील ४९५ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरले आहेत. संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यावर महिना अखेर रक्कम जमा झाली आहे. विशेष समाजकल्याण उपायुक्त कार्यालयाने एस.सी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या खात्यावर ९ कोटी रूपये, व्हीजेएनटी व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येकी ४ कोटी ५० लाख रूपये, आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर ३५ लाख रूपये जमा केले आहेत.
खात्यावर शिष्यवृत्ती जमा झाल्या नाही, अशा विद्यार्थ्यांनी बँक पासबुकाची छायांकित कार्यालयात आणून खात्री करावी, ज्या महाविद्यालयांनी त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांचे बी स्टेटमेंट सादर केले नाही, त्यांनी महिनाभराच्या आत सादर करावे, असे आवाहन विशेष समाजकल्याण उपायुक्त बी.एन वीर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
काही विद्यार्थी वंचितच
गुरूमिश्री हॉमिओपॅथिक महाविद्यालय शेलगाव येथील विद्यार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा झाली नाही. समाजकल्याण विभागाकडे चकरा मारूनही काम झाले नाही, अशी तक्रार रत्नाकर किंगरे, बद्रीनाथ पुंड, धनंजय सताळे, कैलास बोरकर, तात्याभाऊ सोनटक्के, विष्णू माने, अविनाश साबळे, अर्जुन जाधव, संजय गवारे यांनी केली.

Web Title: 18 crores of scholarships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.