बालअपचाऱ्याकडून १८ सायकली जप्त

By Admin | Updated: December 23, 2015 23:42 IST2015-12-23T23:29:40+5:302015-12-23T23:42:35+5:30

जालना : सायकल चोरीप्रकरणाचा सदर बाजार पोलिसांनी छडा लावून बालअपचाऱ्यास ताब्यात घेऊन चोरीच्या १८ सायकली जप्त केल्या आहेत.

18 bicycles seized from the child's parents | बालअपचाऱ्याकडून १८ सायकली जप्त

बालअपचाऱ्याकडून १८ सायकली जप्त


जालना : सायकल चोरीप्रकरणाचा सदर बाजार पोलिसांनी छडा लावून बालअपचाऱ्यास ताब्यात घेऊन चोरीच्या १८ सायकली जप्त केल्या आहेत.
जालना शहरात मागील काही दिवसांपासून मोटार सायकल बरोबरच सायकल चोरीच्या घटनाही वाढल्या होत्या.
याची माहिती काढून सदर बाजार पोलिसांनी शहरातील दत्त नगर भागातील एक बालअपचारी शहरातील ठाकरे कोचिंग क्लास समोरून चोरीस गेलेली सायकल गांधीनगर भागात विक्री करत असताना पोलिसांच्या एका पथकाने त्यास ताब्यात घेतले.
त्याची चौकशी केली असता त्याने बऱ्याच सायकली चोरल्याची कबुली देवून त्याच्या ताब्यातील विविध कंपनीच्या गेअर व शॉकअप असलेल्या १८ सायकली काढून दिल्या. त्या पोलिसांनी जप्त केल्या.
सदर कामगिरी ही प्रभारी पोलिस अधिक्षक राहुल माकणीकर, सहाय्यक पोलिस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलिस ठाण्याचे साई पवार, संतोष इंगळे, कृष्णा तंगे, नंदू खंदारे, संदीप आंबटवार, प्रदिप भंडारे, नितीन झोटे, सुनीता कांबळे, ज्योती राठोड, जतीन ओहेळ यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: 18 bicycles seized from the child's parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.