लायन्स क्लब औरंगाबाद मेनला १८ पारितोषिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:06 IST2021-02-09T04:06:11+5:302021-02-09T04:06:11+5:30

फोटो डिस्प्लेमध्ये प्रथम, सर्वोत्कृष्ट सेक्रेटरी एलोकेशन माधुरी चौधरी, इ स्क्रॅब बुक द्वितीय पारितोषिक, सर्वोत्कृष्ट ...

18 awards to Lions Club Aurangabad Main | लायन्स क्लब औरंगाबाद मेनला १८ पारितोषिके

लायन्स क्लब औरंगाबाद मेनला १८ पारितोषिके

फोटो डिस्प्लेमध्ये प्रथम, सर्वोत्कृष्ट सेक्रेटरी एलोकेशन माधुरी चौधरी, इ स्क्रॅब बुक द्वितीय पारितोषिक, सर्वोत्कृष्ट अद्ययावत ज्ञान द्वितीय पारितोषिक सुरेश क्षत्रिय, सर्वोत्कृष्ट झेड सी द्वितीय पारितोषिक मारोती फुलारी, सर्वोत्कृष्ट सक्सेसफुल स्टोरी, सर्वोत्कृष्ट मुलाखत व फाइल प्रेसिडेंट द्वितीय पारितोषिक डाॅ.उषा नानपाल, सर्वोत्कृष्ट मुलाखत व फाइल सेक्रेटरी द्वितीय पारितोषिक माधुरी चौधरी, सर्वोत्कृष्ट मुलाखत व फाइल कोषाध्यक्ष पुरस्कार विमला हब्बू, प्रथम उपस्थिती पुरस्कार महेंद्र चौधरी, ॲप्रिसिएशन अवॉर्ड प्रेसिडेंट उषा नागपाल, सेक्रेटरी माधुरी चौधरी, कायमस्वरूपी प्रोजेक्ट ॲप्रिसिएशन अवॉर्ड लायन्स ब्लड बँक, लायन्स बालसदन अशी विविध पारितोषिके लायन्स क्लब मेनने पटकाविली. यासाठी तनसुख झांबड यांचे मार्गदर्शन व सुरेश क्षत्रिय, रमेश नागपाल व महेंद्र चौधरी यांचे सहकार्य मिळाले.

आंतरराष्ट्रीय संचालक नवल मालू, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विवेक अभ्यंकर, संदीप मालू, महावीर पाटणी, राजेश राऊत, तनसुख झांबड यांची यावेळी उपस्थिती होती. स्नेहल अभ्यंकर व राजेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला दत्तात्रय औसेकर, जितेंद्र महाजन, मोरेश्वर कुलकर्णी यांनी सहकार्य केले.

फोटो ओळ :

पारितोषिके स्वीकारताना लायन्स क्लब औरंगाबाद मेनच्या पदाधिकारी.

Web Title: 18 awards to Lions Club Aurangabad Main