१७९ गावात दूषित पाणी जिल्ह्यातील २२८ स्त्रोतांचे पाणी नमुने दूषित

By Admin | Updated: November 6, 2014 01:34 IST2014-11-06T00:47:45+5:302014-11-06T01:34:49+5:30

उस्मानाबाद : सार्वजनिक स्त्रोताच्या पाण्याची अणूजीवविषयक तपासणी नोव्हेंबर महिन्यात करण्यात आली आहे. यामध्ये ९६३ पैकी २२८ स्त्रोतांचे पाणी दूषित असल्याचे आढळून आले असून

179 contaminated water contaminated water samples of 228 sources in the district | १७९ गावात दूषित पाणी जिल्ह्यातील २२८ स्त्रोतांचे पाणी नमुने दूषित

१७९ गावात दूषित पाणी जिल्ह्यातील २२८ स्त्रोतांचे पाणी नमुने दूषित


उस्मानाबाद : सार्वजनिक स्त्रोताच्या पाण्याची अणूजीवविषयक तपासणी नोव्हेंबर महिन्यात करण्यात आली आहे. यामध्ये ९६३ पैकी २२८ स्त्रोतांचे पाणी दूषित असल्याचे आढळून आले असून, याचे प्रमाण जिल्ह्यात २४ टक्के आहे.
मागील तीन वर्षापासून जिल्ह्यामध्ये सातत्याने वार्षिक सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस पडत आहे. सध्या अनेक जलस्त्रोत आटले असून, काही शेवटच्या घटका मोजत आहेत. पाणी पातळी जसजशी खालावत आहे त्यानुसार दुषित पाण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेकडून दर महिन्याला जिल्ह्यातील सार्वजनिक स्त्रोतांचे पाणी नमुने घेऊन तपासणी करण्यात येते. नोव्हेंबर महिन्यामध्ये जिल्ह्यातील ९६३ नमुने तपासणीसाठी या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. तपासणीअंती सुमारे २२८ स्त्रोतांचे पाणी दूषित आढळून आले आहे.
यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील २२० स्त्रोतांचे पाणी नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ५१ पाणी नमुने हे दूषित असल्याचे आढळून आले आहे. त्याप्रमाणे तुळजापूर तालुक्यातील १४२ पैकी ६७, परंडा ७५ पैकी १४, कळंब १२५ पैकी २२, भूम १४१ पैकी २२, लोहारा ९३ पैकी १९ तर वाशी तालुक्यातील ६९ पैकी १४ स्त्रोतांचे पाणी पिण्यास योग्य नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले असून सदर अहवाल जि.प.ला सादर केला आहे.(प्रतिनिधी)
उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्रातील ७ गावात पाणी नमुने दूषित आढळले आहेत. कोंड ३, पोहनेर १, समुद्रवाणी ९, येडशी २, जागजी ५, पाटोदा ४,कळंब दहिफळ ३, ईटकूर ४, मोहा २ , मंगरुळ ५, शिराढोण ४, येरमाळा ३,लोहारा कानेगाव ५, जेवळी ७,माकणी ६, उमरगा तालुक्यातील नाईचाकूर ३, आलूर ३, येणेगूर ४,मुळज ४, परंडा तालुक्यातील आसू ४, अनाळा ४, जवळा (नि) ३, शेळगाव २, तुळजापूर तालुक्यातील अणदूर १, जळकोट ६, काटगाव ५, मंगरुळ ९, नळदुर्ग ८, सलगरा ६, सावरगाव ७, वाशी तालुक्यातील पारा व पारगाव प्रत्येक पाच गावात दुषित पाणी आढळून आले. भूम तालुक्यातील अंभी ५, ईट ४, माणकेश्वर ३, पाथ्रूड ३, वालवड ७ जिल्ह्यातील १७९ गावात दुषित पाणी नमुन आढळून आले.

Web Title: 179 contaminated water contaminated water samples of 228 sources in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.