कुंभमेळ््यासाठी लातूरचे १७८ पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर
By Admin | Updated: August 20, 2015 00:47 IST2015-08-20T00:39:23+5:302015-08-20T00:47:12+5:30
लातूर : नाशिक येथे होत असलेल्या कुंभमेळ््याच्या बंदोबस्तासाठी लातूर येथून पोलीस आणि होमगार्ड कर्मचारी रवाना झाले आहेत़

कुंभमेळ््यासाठी लातूरचे १७८ पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर
लातूर : नाशिक येथे होत असलेल्या कुंभमेळ््याच्या बंदोबस्तासाठी लातूर येथून पोलीस आणि होमगार्ड कर्मचारी रवाना झाले आहेत़ १५० होमगार्ड आणि २८ पोलीस असे एकूण १७८ कर्मचारी कुंभमेळ्याच्या बंदोबस्ताला गेले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली़
नाशिक येथे होत असलेल्या कुंभमेळ््यासाठी लातूर पोलीस दलातील २४ पोलीस कर्मचारी, २ उपविभागीय अधिकारी, २ पोलिस निरीक्षक असे एकूण २८ कर्मचारी १७ आॅगस्ट रोजी बंदोबस्तासाठी नाशिकला रवाना झाले आहेत़ होमगार्डही बंदोबस्ताला गेले आहेत़ एकूण १५० होमगार्डमध्ये १०० पुरुष तर ५० महिला होमगार्ड आहेत़ १६ आॅगस्ट रोजी ते नाशिकला रवाना झाले असल्याचे जिल्हा समुपदेशक अधिकारी डी. एच. अंधारे, प्रशासकीय अधिकारी ए. आर. गुरव यांनी दिली. तब्बल ३६ दिवस हे पोलीस कर्मचारी कुंभमेळ््यातील सुरक्षेसाठी कार्यरत राहणार आहेत. लातूर पोलीस दलाचे एकूण १७८ पोलीस कर्मचारी कुंभमेळ्याच्या बंदोबस्तावर ३६ दिवस राहणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली़ (प्रतिनिधी)