नऊ मतदारसंघांत १७२ जणांनी नेले अर्ज
By Admin | Updated: September 21, 2014 00:39 IST2014-09-21T00:25:08+5:302014-09-21T00:39:11+5:30
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांतून तब्बल १७२ इच्छुक उमेदवार ३८७ उमेदवारी अर्ज घेऊन गेले.

नऊ मतदारसंघांत १७२ जणांनी नेले अर्ज
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांतून तब्बल १७२ इच्छुक उमेदवार ३८७ उमेदवारी अर्ज घेऊन गेले. तर एका अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा उमेदवारी अर्ज औरंगाबाद पूर्व मतदारसंघात दाखल झाला आहे.
विधानसभेसाठी १५ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत त्या- त्या ठिकाणी अर्जांचे वितरण आणि हे अर्ज स्वीकारण्याचे काम केले जात आहे. अर्ज वितरण आणि स्वीकृतीची मुदत सकाळी ११ वाजेपासून सुरू झाली. त्यानंतर लगेचच इच्छुकांनी वेगवेगळ्या मतदारसंघांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज घेण्यास हजेरी लावली.
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३८ जणांनी ९१ अर्ज नेले. पूर्व मतदारसंघात आज १९ इच्छुक ३९ अर्ज घेऊन गेले. तर पश्चिम मतदारसंघात १८ जण ४९ अर्ज घेऊन गेले. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघांच्या कार्यालयात दिवसभर इच्छुकांची वर्दळ होती. जिल्ह्यात आज दिवसभरात केवळ एक उमेदवारी अर्ज दाखल झाला. अपक्ष उमेदवार म्हणून मोहम्मद किस्मतवाला कासीम यांनी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून हा अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २७ सप्टेंबर आहे.
नामनिर्देशनपत्र वाटप
मतदारसंघव्यक्तीअर्ज
सिल्लोड १७३८
कन्नड १२३६
फुलंब्री १७३४
औरंगाबाद मध्य३८९१
औरंगाबाद पश्चिम१८४९
औरंगाबाद पूर्व१९३९
पैठण२२४१
गंगापूर१३३१
वैजापूर१६२८
एकूण१७२३८७