आषाढीसाठी १७० जादा बसगाड्यांची सोय
By Admin | Updated: July 9, 2015 00:21 IST2015-07-09T00:21:21+5:302015-07-09T00:21:21+5:30
बीड : पंढरपूर येथे आषाढी एकदाशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी बीड जिल्ह्यातून लाखो भाविक जातात. या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य परिवहन

आषाढीसाठी १७० जादा बसगाड्यांची सोय
बीड : पंढरपूर येथे आषाढी एकदाशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी बीड जिल्ह्यातून लाखो भाविक जातात. या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागीय कार्यालयाने जिल्ह्यात १७० जादा बसगाड्यांची व्यवस्था केली आहे.
गतवर्षी १५७ बसगाड्यांची व्यवस्था केली होती. यात महामंडळाला ४६ लाख ५७ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र, या बसगाड्या अपुऱ्या पडल्याने यावर्षी यामध्ये १३ गाड्यांची वाढ करण्यात आली आहे. भाविकांची गर्दी पाहता आणखी बसगाड्या वाढविण्यात येणार असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी उध्दव वावरे यांनी सांगितले.
बीड आगारातून सर्वाधिक बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत. यासाठी योग्य ते नियोजन करण्यात आले असल्याचे आगारप्रमुख ए. एस. भुसारी यांनी सांगितले. बसस्थानकात भाविकांना माहिती देण्यासाठी कर्मचारी नेमल्याचे स्थानकप्रमुख शीतल मिसाळ यांनी सांगितले. एस. एच. कराड, महाजन आदी कर्मचारी यावर नियंत्रण ठेवतील. (प्रतिनिधी)