शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील १७ अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: September 14, 2014 00:21 IST

औरंगाबाद : उपकुलसचिव दर्जाचे ६ आणि अन्य ११ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

औरंगाबाद : उपकुलसचिव दर्जाचे ६ आणि अन्य ११ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करून कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘राजकारणा’चे मूळच छाटण्याचा धाडसी निर्णय शनिवारी रात्री उशिरा घेतला. कुलगुरूंच्या या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून एकाच जागेवर ठाण मांडून बसलेल्या या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. यासंदर्भात विद्यापीठ सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, ४ जून रोजी डॉ. चोपडे यांनी कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी सलग तीन महिने विद्यापीठातील जवळपास सर्वच शैक्षणिक विभाग, आस्थापना, परीक्षा विभाग व अन्य कार्यालयांत चालणाऱ्या कामकाजाचे बारकाईने निरीक्षण व अभ्यास केला. तेव्हा अनेक अधिकारी व काही प्राध्यापकसुद्धा विद्यापीठात बसून आपले दैनंदिन काम कमी आणि राजकारण जास्त करीत आहेत, तर दुसरीकडे ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा टिकवून ठेवून विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना ते जाणीवपूर्वक खोडा घालण्याचे प्रयत्न करीत आहेत. ही बाब लक्षात आल्यामुळे कुलगुरूंनी स्वच्छ प्रशासन, गतिमान प्रशासन व पारदर्शी प्रशासनासाठी पहिल्या टप्प्यात १७ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करून ते शनिवारी रात्री उशिरा जळगावकडे रवाना झाले. सोमवारी संबंधितांना बदल्यांचे आदेश बजावले जातील. दुसऱ्या टप्प्यात आणखी काही उपद्रवी अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातील, असे विद्यापीठ सूत्रांकडून समजले आहे. दरम्यान, काही जणांनी बदली रद्द करण्यासाठी राजकीय दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.कोठून कुठे झाली बदलीविद्यापीठातील उपकुलसचिव दर्जाच्या ६ अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे करण्यात आल्या आहेत. (कंसात त्यांचे पूर्वीचे कार्यालय) डॉ. गणेश मंझा (आस्थापना) यांची बदली उस्मानाबाद उपकेंद्र येथे, ईश्वर मंझा यांची बदली विशेष कक्ष, डी.एम. नेटके (परीक्षा विभाग) यांची अकॅडेमिक विभागात, दिलीप भरड (परीक्षा विभाग) यांची सचिवालयात, विष्णू कऱ्हाळे (अकॅडेमिक) यांची आस्थापना विभागात, विजय मोरे (विशेष कक्ष) यांची परीक्षा विभागात बदली करण्यात आली आहे. याशिवाय कुलसचिव कार्यालयातील बी.एन. फड यांची बदली कुलगुरू कार्यालयात व कक्ष अधिकारी हेमलता ठाकरे यांचीही बदली करण्यात आली आहे.