१७ तोळे सोन्याचे दागिने पळविले
By Admin | Updated: December 9, 2014 01:01 IST2014-12-09T00:51:57+5:302014-12-09T01:01:57+5:30
औरंगाबाद : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या निष्क्रियतेमुळे या परिसरातील गुन्हेगारांचा धुमाकूळ सुरूच आहे.

१७ तोळे सोन्याचे दागिने पळविले
औरंगाबाद : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या निष्क्रियतेमुळे या परिसरातील गुन्हेगारांचा धुमाकूळ सुरूच आहे. सोमवारीही चोरट्यांनी गजबजलेल्या गजानन मंदिर परिसरातील सारंग सोसायटीतील एक घर भरदिवसा फोडून तब्बल १७ तोळे सोन्याचे दागिने, चांदीची मूर्ती व रोख रक्कम, असा सुमारे साडेसात लाखांचा ऐवज पळविला.
विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी प्रमुख तथा प्राध्यापक डॉ. प्रल्हाद लुलेकर हे सारंग सोसायटीत राहतात. त्यांच्या पत्नी काल मुलाला भेटण्यासाठी पुण्याला गेल्या होत्या. डॉ. लुलेकर घरी एकटेच होते. आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नित्याप्रमाणे घराला कुलूप लावून ते विद्यापीठात निघून गेले.
सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते घरी परत आले, तेव्हा घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले, घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले, कपाट तुटलेले आणि त्यातील तब्बल १७ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, चांदीची मूर्ती व ३० हजार रुपये रोख रक्कम गायब असल्याचे त्यांच्या नजरेस पडले. घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी भरदिवसा आपले घर फोडल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. लुलेकर यांनी पोलिसांना कळविले.४
डॉ. लुलेकर यांनी गुन्हा घडल्यानंतर तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधून माहिती कळविली. घटनास्थळ मुकुंदवाडी ठाण्याच्या हद्दीत असल्याने नियंत्रण कक्षाने मुकुंदवाडीला तात्काळ माहिती कळविली. माहिती मिळाल्यानंतर फौजदार दिनेश सोनवणे व त्यांचे सहकारी तब्बल एक तास उशिरा घटनास्थळी पोहोचले.
४मुकुंदवाडी ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अशा निष्क्रियतेमुळेच या परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी वाढली आहे.