जागेअभावी रखडली १७ तलाठी सज्जांची कामे!

By Admin | Updated: September 17, 2014 01:14 IST2014-09-17T00:27:09+5:302014-09-17T01:14:05+5:30

बीड : जिल्ह्यातील २२० तलाठी सज्जे व ३१ मंडळ कार्यालयांच्या बांधकामास परवानगी मिळाली होती. मात्र, १७ तलाठी सज्जांचे बांधकाम केवळ जागेअभावी रखडले आहे.

17 slapstick work ready for awakening! | जागेअभावी रखडली १७ तलाठी सज्जांची कामे!

जागेअभावी रखडली १७ तलाठी सज्जांची कामे!


बीड : जिल्ह्यातील २२० तलाठी सज्जे व ३१ मंडळ कार्यालयांच्या बांधकामास परवानगी मिळाली होती. मात्र, १७ तलाठी सज्जांचे बांधकाम केवळ जागेअभावी रखडले आहे. तलाठी सज्जांसाठी कोट्यवधींचा निधी आला; पण बांधकामासाठी भूखंड मिळत नसल्याने हा निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शासनाच्या १० कलमी कार्यक्रमांतर्गत तलाठी सज्जे बांधण्यासाठी ३९ कोटी ३ लाख लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली आहे. २२० तलाठी सज्जांच्या बांधकामास मंजुरी मिळाली होती. त्यापैकी ४५ सज्जांचे काम सुरु आहे. १४७ सज्जांचे काम पूर्ण झाले आहे. जागेअभावी १७ सज्जांचे काम रखडले आहे. तर ११ सज्जांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे;पण अद्याप कामांना सुरुवात नाही.
१० मंडळ कार्यालयांचे कामही खोळंबलेलेच!
जिल्ह्यातील ३१ मंडळ कार्यालयांच्या बांधकामांसाठी २९ कोटी ७९ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली होती. त्यापैकी केवळ २१ कार्यालयांचे काम पूर्ण होऊ शकले आहे. उर्वरित १० कार्यालयांचे काम खोळंबलेलेच आहे. आष्टी तालुक्यातील एका मंडळ कार्यालयासाठी जागा नाही तर उर्वरित मंडळ कार्यालयांचे कामांना सुरुवात झाली आहे;पण कामे पूर्णत्वाकडे गेलेली नाहीत.
अत्याधुनिक कार्यालये
तलाठी सज्जे व मंडळ कार्यालयांच्या नुतन इमारतीत अत्याधुनिक सोयी- सुविधायुक्त आहेत. ३३ बाय ३३ इतक्या क्षेत्रफळावर बांधकाम होत असून तेथे तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या निवासाचीही व्यवस्था केली आहे. एका कार्यालयासाठी साधारण आठ लाख रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. बांधकाम दर्जेदार व्हावे, यासाठी संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता आर. आय. सय्यद यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
असे आहेत तलाठी सज्जे
तालुकामंजूर कामेपूर्णअपूर्ण कामे
बीड६१३९२२
गेवराई५७४९०८
शिरुर२१२१००
पाटोदा२२१०१२
आष्टी४५२२२३
वडवणी१४०६०८
एकूण२२०१४७७३

Web Title: 17 slapstick work ready for awakening!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.