१७ शाळांची होणार त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी
By Admin | Updated: September 24, 2014 00:45 IST2014-09-24T00:27:58+5:302014-09-24T00:45:02+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील माध्यमिक आणि प्राथमिक मिळून १७ शाळा अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आल्या होत्या. मात्र जिल्हास्तरावरुन पाठविलेल्या अहवालाची क्रॉस

१७ शाळांची होणार त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी
उस्मानाबाद : जिल्ह्यातील माध्यमिक आणि प्राथमिक मिळून १७ शाळा अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आल्या होत्या. मात्र जिल्हास्तरावरुन पाठविलेल्या अहवालाची क्रॉस तपासणी त्रयस्थ यंत्रणेच्या माध्यमातून केली जाणार आहे. हे पथक सोमवारपासून जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहे.
शासनाने विनाअनुदान तत्वावर अनेक शाळांना मंजुरी दिली आहे. यातील पात्र ठरणाऱ्या शाळांना अनुदान देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १४ माध्यमिक तर ३ प्राथमिक शाळा यामध्ये पात्र ठरल्या होत्या. मात्र शिक्षण विभागाने पाठविलेला हा अहवाल तंतोतंत जुळतो की नाही याची तपासणी करण्यासाठी त्रयस्थ यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये अमरावतीचे शिक्षण उपसंचालक राम पवार, शिक्षणाधिकारी सोनवणे यांच्यासह अन्य दोघांचा समावेश आहे.
शाळांची तपासणी करण्यासाठी हे पथक २२ सप्टेंबर रोजी जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहे. हे पथक २७ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात राहणार असून, सदर शाळांनी अनुदानासाठी पाठविलेल्या प्रस्तावामध्ये नमूद केलेल्या बाबी सत्य आहेत का? याची खातरजमा करणार आहे. (प्रतिनिधी)