सरपंचपदासाठीच्या १७ जणांची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:32 IST2017-09-28T00:32:54+5:302017-09-28T00:32:54+5:30
तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी होणाºया ग्रा. प. निवडणुकीत सरपंच ५९ तर सदस्य पदासाठी २७८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सरपंचाचे १७ तर सदस्यांचे ४६ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत.

सरपंचपदासाठीच्या १७ जणांची माघार
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी होणाºया ग्रा. प. निवडणुकीत सरपंच ५९ तर सदस्य पदासाठी २७८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सरपंचाचे १७ तर सदस्यांचे ४६ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत.
सध्या सरपंचपदासाठी ४२ तर सदस्यपदासाठी २३२ उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तहसील परिसरात उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली होती. तसेच अर्ज माघे घेण्याची इच्छा नसणारे उमेदवार मात्र शहरातून काढता पाय घेत होते. तर काही जणांचे तीन वाजेपर्यंत मोबाईल फोनच बंद होते. त्यामुळे उमेदवारांचा समर्थकांकडून शोध घेणे सुरु होते. मात्र काहींना तर अपेक्षा नसणाºयाही उमेदवारांनी अर्ज माघे घेतल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे ‘कभी खुशी कभी गम’ अशी परिस्थिती उमेदवारांमध्ये झाली होती. तर चिन्हे वाटप करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत कार्यालयात सुरु होती.