वैद्यकीय पदव्युत्तरच्या वाढीव १७ जागांना मंजुरी
By Admin | Updated: March 5, 2017 00:31 IST2017-03-05T00:30:08+5:302017-03-05T00:31:44+5:30
लातूर : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या वाढीव १७ जागांना मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे़

वैद्यकीय पदव्युत्तरच्या वाढीव १७ जागांना मंजुरी
लातूर : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या वाढीव १७ जागांना मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे़ त्यामुळे लातुरातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागांची संख्या आता ५८ झाली आहे़ या वाढीव जागेमुळे रूग्णांना आणखी सुविधा मिळण्यास मदत होणार आहे़
लातुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयात पदवी (एमबीबीएस) शिक्षणाच्या दीडशे जागा आहेत़ सर्वोपचारमध्ये अत्याधुनिक यंत्र सामग्री उपलब्ध असल्याने व दर्जेदार सुविधा मिळत असल्याने जिल्ह्याबरोबरच कर्नाटक व सीमावर्ती भागातील रूग्ण उपचारासाठी येतात़ रूग्णालयात दररोज उपचारासाठी १२०० पेक्षा अधिक नोंदणी असते़