१७ वैद्यकीय अधिकारी होणार रुजू
By Admin | Updated: April 28, 2015 00:27 IST2015-04-28T00:12:42+5:302015-04-28T00:27:46+5:30
जालना : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत गेल्या अनेक दिवसांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांचा प्रश्न कायम आहे.

१७ वैद्यकीय अधिकारी होणार रुजू
जालना : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत गेल्या अनेक दिवसांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांचा प्रश्न कायम आहे. मात्र येत्या आठवडाभरात १७ नवीन वैद्यकीय अधिकारी रुजू होणार असल्याची माहिती आरोग्य व शिक्षण सभापती ए.जे. बोराडे यांनी दिली.
जिल्ह्यात ग्रामीण भागात ४० प्राथमिक आरोग्य केंद्रे असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ८२ जागा मंजूर आहेत. त्यापैकी ६५ जागा भरलेल्या आहेत. १७ जागा रिक्त आहेत.
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची आठ पदे मंजूर असून त्यापैकी २ पदे रिक्त आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामीण भागात आरोग्यसेवेचा प्रश्न कायम होता.
मागील एक वर्षात वैद्यकीय अधिकाऱ्यांची काही पदे भरण्यात आली. परंतु ७ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उच्च शिक्षणासाठी आपल्या पदाचे राजीनामे दिले.
याशिवाय आणखी १० पदे रिक्त होती. ही रिक्त पदे भरावीत, या मागणीसाठी सभापती बोराडे यांनी मार्च महिन्यात राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची भेट घेतली होती. त्यानंतर या सर्व रिक्त जागा भरण्याचे संकेत त्यांच्याकडून मिळाले होते.
याबाबतचा पाठपुरावा सुरू असून येत्या आठवडाभरात या रिक्त जागा भरल्या जातील, असा विश्वास सभापती बोराडे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)