१७ लाख रूपयांचा गुटखा नष्ट
By Admin | Updated: November 13, 2016 00:20 IST2016-11-13T00:22:03+5:302016-11-13T00:20:01+5:30
ब्ाीड : वेगवेगळ्या कारवायांत पकडलेला १७ लाख रुपयांचा गुटखा अन्न प्रशासन व पोलिसांनी मोची पिंपळगाव शिवारात शनिवारी जप्त केला.

१७ लाख रूपयांचा गुटखा नष्ट
ब्ाीड : वेगवेगळ्या कारवायांत पकडलेला १७ लाख रुपयांचा गुटखा अन्न प्रशासन व पोलिसांनी मोची पिंपळगाव शिवारात शनिवारी जप्त केला.
दोन वर्षांपूर्वी गुटख्याला बंद घालण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यात पानटपऱ्या, किराणा दुकानांतही गुटख्याची सर्रास विक्री होते. अन्न प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले होते. १६ लाख ७८ हजार ५०० रुपये किमतीच्या गुटख्याचे १८५ पोते कार्यालयातच जप्त करुन ठेवले होते. शनिवारी मोची पिंपळगाव शिवारात हा गुटखा टेम्पोतून नेला. तेथे बॉयलरमध्ये टाकून गुटखा जाळण्यात आला. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी सुनंदा जाधवर, औषध निरीक्षक आर. बी. डोईफोडे, पेठ बीड ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार जाधव उपस्थित होते. जप्त केलेल्या मुद्देमालाच्या काही चाचण्या करावयाच्या होत्या. पावसामुळेही गुटखा नष्ट करण्यात अडचणी आल्या होत्या, असे अन्न सुरक्षा अधिकारी जाधवर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)