अवैध विक्रीसाठीचे १७ सिलेंडर जप्त
By Admin | Updated: October 21, 2014 00:57 IST2014-10-21T00:31:13+5:302014-10-21T00:57:07+5:30
लातूर : शहरातील सुशिलादेवी नगर भागात अवैध सिलेंडरची विक्री एकजण करीत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून त्याच्याकडे १७ सिलेंडर मंगळवारी

अवैध विक्रीसाठीचे १७ सिलेंडर जप्त
लातूर : शहरातील सुशिलादेवी नगर भागात अवैध सिलेंडरची विक्री एकजण करीत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून त्याच्याकडे १७ सिलेंडर मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जप्त केले असल्याची घटना घडली़
शहरातील सुशिलादेवी नगर भागात राहणारा नितीन बायस हा व्यक्ती गेल्या एक वर्षापासून अवैध पद्धतीने सिलेंडर घेवून गाड्यासाठी व शहरातील हॉटेलसाठी त्या सिलेंडरची विक्री करत होता़ याबाबत माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी़ जी़ मिसाळ यांच्या पथकाने एपीआय सुधाकर बावकर, लक्ष्मण कोमवाड, संजय भोसले, रामचंद्र ढगे, बाळासाहेब मस्के, राजेंद्र टेकाळे, सोनटक्के, गवाडे यांनी जुना औसा रोड भागातील अवैध सिलेंडर विक्री करणाऱ्या नितीन बायस याच्या घरी धाड टाकून १७ सिलेंडर व इलेक्ट्रॉनिक मोटार मंगळवारी पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी बावकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजी नगर पोलिसात गुन्हा नोंद आहे. (प्रतिनिधी)