सेनगावात तब्बल १६९ अर्ज दाखल

By Admin | Updated: December 17, 2015 23:49 IST2015-12-17T23:47:25+5:302015-12-17T23:49:14+5:30

सेनगाव : येथील नगर पंचायत निवडणुकरीता शेवटच्या दिवशी ६८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून आता रिंगणात एकूण १६९ उमेदवारी अर्ज आले आहेत.

169 nominations filed in Senga | सेनगावात तब्बल १६९ अर्ज दाखल

सेनगावात तब्बल १६९ अर्ज दाखल

सेनगाव : येथील नगर पंचायत निवडणुकरीता शेवटच्या दिवशी ६८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून आता रिंगणात एकूण १६९ उमेदवारी अर्ज आले आहेत.
सेनगाव नगरपंचायत निवडणुकीच्या १७ प्रभागाकरीता उमेदवारी दाखल करण्याचा १७ डिसेंबर ही शेवटचा दिवस होता. गुरूवारपर्यंत ९१ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. आज ६८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. एकूण १६९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बहुतांश उमेदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केल्याने उमेदवारी अर्जाची संख्या जास्त झाली आहे. पक्षाचा उमेदवारीचा बी फॉर्म जोडण्याचा शेवटचा दिवस असल्याने विविध पक्षाचा उमेदवारांची मोठी लगबग पहावयास मिळाली. एका प्रभागात जवळपास पाच ते सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अवधी संपल्यानंतरच निवडणूक लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
सर्व पक्षांनी शुक्रवारी आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली. नगर पंचायत निवडणूकीकरीता मातब्बर उमेदवार रिंगणात उतरले आहेत. प्रभाग एकमध्ये जि.प. सदस्य ओमप्रकाश देशमुख, भाजपाचे अभिजित देशमुख, प्रभाग चारमध्ये अंजली आप्पासाहेब देशमुख, प्रभाग अकरामध्ये मनसे जिल्हा सचिव संदेश देशमुख, काँग्रेसचे सतीश खाडे, राष्ट्रवादीचे उमेश देशमुख तर प्रभाग सहामध्ये काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश देशमुख यांच्या पत्नी तारामती देशमुख तर प्रभाग १४ मध्ये माजी उपसभापती कैलास देशमुख आदी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. (वार्ताहर)

Web Title: 169 nominations filed in Senga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.