१६६२ शेतक-यांनाच वैजापुरात कर्जमाफी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 01:00 IST2017-12-02T00:59:51+5:302017-12-02T01:00:12+5:30
कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ग्रीन लिस्टमध्ये वैजापूर तालुक्यातील १६६२ शेतक-यांचा समावेश झाला असून या शेतकºयांच्या कर्जखात्यात तीन कोटी ६६ लाख ७७ हजार ८९७ रुपये जमा झाले आहेत.

१६६२ शेतक-यांनाच वैजापुरात कर्जमाफी!
लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ग्रीन लिस्टमध्ये वैजापूर तालुक्यातील १६६२ शेतक-यांचा समावेश झाला असून या शेतकºयांच्या कर्जखात्यात तीन कोटी ६६ लाख ७७ हजार ८९७ रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांना थोडा दिलासा मिळाला आहे. जिल्हा बँकेच्या तालुक्यातील पंधरा शाखांमध्ये कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा बँकेचे कर्ज अधिकारी उगले यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत गेल्या जुलै महिन्यात राज्यातील फडणवीस सरकारने शेतकºयांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज असणाºया थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफी देण्यात येणार आहे. त्यामुळे अशा शेतकºयांची माहिती शासनाकडून ठराविक नमुन्यात आॅनलाईन मागविण्यात आली होती. त्यानुसार आता शासनाने कर्जमाफीसाठी पात्र असणाºयांची ग्रीन लिस्ट जाहीर केली.
गावनिहाय मिळालेला लाभ
दहेगाव (३०), धोंदलगाव (१०), गारज (४७), खंडाळा (२२९), लाडगाव (५४), लासूरगाव (४०), लोणी (१४), वैजापूर (५६९), महालगाव (२२७), माळीघोगरगाव (११७), मनूर (३१), पालखेड(८०), परसोडा (२८), शिऊर (९६) व वीरगाव (९०) या पंधरा शाखेतील एकुण १६६२ कर्जदार शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार असणाºया शेतकºयांच्या कर्जखात्यात ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तालुक्यात जवळपास २८ हजार सभासद असून त्यापैकी २५ हजार ३०० सभासद चालू थकबाकीदार आहेत.
याशिवाय महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शहर व शिऊर शाखेतील ९२७ शेतकºयांना सहा कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शहर, परसोडा, महालगाव, खंडाळा व लोणी शाखेतील २ हजार ३१ थकबाकीदार शेतकºयांना तब्बल १२ कोटी ३६ लाख ८९ हजार १९१ रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या वैजापूर शाखेच्या चार हजार थकबाकीदार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरले होते. पण शासनाकडून अद्याप पात्र शेतकºयांची ग्रीन लिस्ट प्राप्त न झाल्याने या शेतकºयांच्या कर्जमाफीबाबत प्रश्नचिन्ह आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या थकबाकीदार शेतकºयांबाबत असाच प्रकार झाला आहे. त्यांची माहिती अद्याप मिळाली नाही.
९० टक्के शेतकरी अजूनही प्रतिक्षेत
तालुक्यात जवळपास चाळीस हजार शेतकºयांनी अर्ज दाखल केले. त्यापैकी पहिल्या यादीत केवळ चार हजार ६२० शेतकºयांना पात्र ठरवून २५ कोटी १७ लाख रुपये शासनाने उपलब्ध करून दिले. प्रत्यक्षात सुमारे दोन हजार शेतकºयांच्या खात्यातच माफीची रक्कम पोहोचली.
किचकट नियमावलीत अडकलेल्या यादीतील घोळामुळे अनेकांच्या खात्यात रक्कम वर्ग होऊ शकली नाही. उर्वरित थकबाकीदार शेतकºयांच्या खात्यावर रक्कम कधी जमा होणार, याचे उत्तर मात्र बँक अधिकाºयांकडेसुद्धा नाही.
बँकेच्या कारभारात गोंधळाची भर
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकेत अनेक सभासदांचे संयुक्त खाते आहे. त्यामुळे संयुक्त खाते असलेल्या खात्यात दोघांच्या नावावर कर्ज असून कर्जमाफीची रक्कमसुद्धा सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे दोघांच्या नावावर पडली आहे. त्यामुळे अशी खाती शोधण्याचे काम बँकांना करावे लागत आहे. परिणामी बँकेच्या कारभारात गोंधळाची भर पडली आहे.
नवीन कर्जदारांनाच कर्जवाटप
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच्या तालुक्यात पंधरा शाखा आहेत. त्यापैकी खंडाळा, महालगाव, धोंदलगाव, मनूर, लोणी, लासूरगाव, गारज व वैजापूर बँक सक्षम असून कर्ज वाटपाचीही त्यांची ऐपत आहे. पण थकबाकीदारांच्या रकमा अजूनही शासनाने वर्ग केलेल्या नाहीत. त्यातच वसुलीही ठप्प आहे. त्यामुळे केवळ नवीन कर्जदारांनाच कर्जवाटप करण्यात येत आहे. जुन्या सभासदांची थकबाकी जमा झाल्याने कर्जवाटप करता येत नसल्याचे बँक अधिकाºयांनी सांगितले.
एका शाखेच्या रकमा दुसºया शाखेत
लाभार्थ्यांची यादी निश्चित झाल्यानंतर स्थानिक पातळीवर खात्री करताना त्रुटी आढळून येत आहेत. कुटुंबाच्या व्याख्येनुसार दीड लाखापेक्षा जास्त रक्कम काही थकबाकीदार सभासदांसाठी उपलब्ध झाली, तर काहींना कमी रकमा उपलब्ध झाल्या. त्यामुळे या रकमा खात्यात वर्ग करू नये, असे निर्देश देण्यात आले. तसेच एका शाखेच्या रकमा दुसºया शाखेत गेल्या, अशीही अडचण निर्माण झाल्याने बँक अधिकाºयांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.