शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

किंचित दिलासा! जायकवाडी धरणात १५ हजार ९२५ क्युसेक आवक, जलसाठ्यात दीड टक्क्याने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 11:33 IST

पावसाचा जोर मंदावल्याने रविवारी नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग घटविण्यात आले आहेत

पैठण :नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून सोडलेले पाणी शनिवारी मध्यरात्री जायकवाडी धरणात येऊन धडकले. रविवारी धरणात १५९२५ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती दरम्यान गेल्या २४ तासात धरणाच्या जलसाठ्यात दीड टक्का वाढ झाली असून रविवारी सायंकाळी जलसाठा ३३.८७% झाला होता.

शनिवारी मध्यरात्री पासून उर्ध्व भागातील धरणातून होणारे विसर्ग कमी करण्यात आल्याने धरणात येणारी आवक घटणार असल्याचे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. शुक्रवारी नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी तेथील धरण समुहातून मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात आले होते. यामुळे गोदावरी नदीस पूर आला, गोदावरीच्या पुराचे पाणी शनिवारी मध्यरात्री जायकवाडी धरणात येऊन धडकले.  दरम्यान, पावसाचा जोर मंदावल्याने रविवारी नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग घटविण्यात आले. गंगापूर धरणातून होणारा विसर्ग बंद करण्यात आला. दारणा धरणातून ११०० तर पालखेड ४३७,आळंदी २१०, कडवा ४२९ क्युसेक्स असे नाममात्र विसर्ग रविवारी सुरू होते. यामुळे नांदुर मधमेश्वर धरणातून २५००० क्युसेक्स गोदावरीत होणारा विसर्ग ४११७ क्युसेक पर्यंत घटविण्यात आला. 

यामुळे गोदावरीचा पूर ओसरत असून जायकवाडी धरणात येणारी आवक  घटणार आहे. रविवारी सायंकाळी ६ वा धरणात १५९२५ क्युसेक्स आवक सुरू होती. धरणाची पाणीपातळी १५०७.०६ फूट झाली असून जलसाठा ३३.८७% झाला आहे. धरणात १४७३.३४४ दलघमी एकूण जलसाठा असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊसNashikनाशिक