टीईटीसाठी १६ हजार उमेदवार
By Admin | Updated: October 31, 2014 00:35 IST2014-10-31T00:30:23+5:302014-10-31T00:35:17+5:30
लातूर : महाराष्ट्र शासनातर्फे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीसाठी १ आॅक्टोबरपासून आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़

टीईटीसाठी १६ हजार उमेदवार
लातूर : महाराष्ट्र शासनातर्फे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीसाठी १ आॅक्टोबरपासून आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़ आॅनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी २२ आक्टोबर पर्यंत ठेवण्यात आला होता़ तर मुळ प्रत दाखल करण्याचा कालावधी आॅक्टोबर पर्यंत ठेवण्यात आला होता़ या माध्यमातून गुरुवार अखेरपर्यंत टीईटीसाठी १६ हजार २०३ अर्ज जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे दाखल करण्यात आले़
डीएड् व बीएड् च्या विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्यांदा टीईटी परीक्षा घेण्यात येत आहे़ या दृष्टीकोनातून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून अर्ज मागविण्यात आले़ यामध्ये आॅनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी १ आॅक्टोबर ते २२ आॅक्टोबर हा कालावधी ठेवण्यात आला होता़ या अर्जाचे मुळ प्रत दाखल करण्याचा कालावधी ३० आॅक्टोबर २०१४ पर्यंत ठेवण्यात आला होता़ गेल्या अनेक दिवसांपासून नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या भावी शिक्षकांनी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी सुरु केली़
अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्याची सोय व्हावी या दृष्टीकोणातून जिल्ह्यातील १० तालुक्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती गटशिक्षणाधिकाऱ्याकडे त्या त्या तालुक्यातील अर्ज स्विकृती करण्याची जबाबदारी देण्यात आली होती़
अर्ज दाखल करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात सोय केल्यामुळे डी़एड़ व बी़एड़च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले़ लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, उदगीर, लातूर, जळकोट, अहमदपूर, रेणापूर, देवणी, शिरुर अनंतपाळ, साकोळ या १० तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत महिनाभरात १६ हजार २०३ विद्यार्थ्यांनी टीईटी परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे अर्ज दाखल केले आहेत़ (प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या टीईटी परीक्षीसाठी जिल्हाभरातून १६ हजार २०३ विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे अर्ज दाखल केले़ या विद्यार्थ्यांची परीक्षा १४ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर ढमाले यांनी दिली.