उत्तराखंडमध्ये जिल्ह्यातील १६ यात्रेकरू!

By Admin | Updated: May 20, 2017 23:41 IST2017-05-20T23:37:27+5:302017-05-20T23:41:25+5:30

लातूर : उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ मार्गावर विष्णुप्रयाग येथे शुक्रवारी झालेल्या भूस्खलनात जिल्ह्यातील १६ यात्रेकरु अडकले होते़ त्यातील अकरा यात्रेकरु सुखरुप आहेत़

16 pilgrims from the district of Uttarakhand | उत्तराखंडमध्ये जिल्ह्यातील १६ यात्रेकरू!

उत्तराखंडमध्ये जिल्ह्यातील १६ यात्रेकरू!

लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ मार्गावर विष्णुप्रयाग येथे शुक्रवारी झालेल्या भूस्खलनात जिल्ह्यातील १६ यात्रेकरु अडकले होते़ त्यातील अकरा यात्रेकरु सुखरुप असून उर्वरित पाच जणांचा शनिवारी रात्री ८ वा़ पर्यंत संपर्क झाला नाही़ संपर्क न झालेले यात्रेकरु हे लातूर शहर व उदगीर येथील आहेत़
उत्तराखंडमध्ये गेलेल्या यात्रेकरूंमध्ये मीनाबाई देवीदास गुरमे (ता़ चिमाचीवाडी, ता़ उदगीर), देवणी तालुक्यातील पेठेवाडी येथील सुभाष पेठे, चंद्रकलाबाई पेठे, रामकिशन बंडगर, दैवशाला बंडगर, ज्ञानोबा पेठे, मंगलबाई पेठे, राधाबाई सुवर्णकार, खरबवाडी येथील लिंबाबाई धनासुरे, चवणहिप्परगा येथील लिंबराज बिराजदार, नागतीर्थवाडी येथील गणपती गरुडे हे १० मे रोजी रेल्वेने मुंबई-सोमनाथ- हरिद्वार मार्गाने गेले आहेत़
लातूरच्या विशाल नगरातील मनोहर नरसिंग कावळे, रेखा मनोहर कावळे, काशीबाई बापूराव व्हटकर, उदगीर येथील विनायक बिराजदार, प्रमिला विनायक बिराजदार हे यात्रेकरू रेल्वेने नांदेडहून नवी दिल्लीस व तेथून खासगी बसने हरिद्वारला गेले आहेत़़
प्रशासन व नातेवाईकांनी या यात्रेकरुंशी शनिवारी पहाटे ५़४५ वा़ संपर्क साधला़ तेव्हा चिमाचीवाडी, पेठेवाडी, खबरवाडी, चवणहिप्परगा, नागतीर्थवाडीचे ११ यात्रेकरू सुखरुप असल्याचे सांगितले़

Web Title: 16 pilgrims from the district of Uttarakhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.