१६ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:36 IST2017-09-07T00:36:19+5:302017-09-07T00:36:19+5:30
: माहे नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया एकूण १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक विभागाच्यावतीने तयारी सुरु आहे. ९ आॅक्टोबर रोजी होणाºया मतदान प्रक्रियेसाठी प्रवर्ग निहाय आरक्षण सुटले आहे.

१६ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : माहे नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया एकूण १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक विभागाच्यावतीने तयारी सुरु आहे. ९ आॅक्टोबर रोजी होणाºया मतदान प्रक्रियेसाठी प्रवर्ग निहाय आरक्षण सुटले आहे.
यामध्ये कोथळ, हानवतखेडा, घोटा सर्वसाधारण महिला तर लिंबाळा मक्ता येथे अनुसूचित जमाती, वडद/ एकांबा येथे सर्वसाधारण, भटसावंगी तांडा - सर्वसाधारण, इडोळी- सर्वसाधारण महिला, चोरजवळा- सर्वसाधारण, सावा- नागरिकांचा मागास वर्ग महिला, आडगाव - सर्वसाधारण महिला, राहोली खु- अनुसूचित जाती महिला, काळकोंडी - सर्वसाधारण, ब्रम्हपूरी- सर्वसाधारण महिला, भटसावंगी तांडा- सर्वसाधारण , भटसावंगी - अनुसूचित जमाती, मालवाडी / चिखलवाडी - अनुसूचित जमाती महिला, संतूक पिंपरी अनुसूचित जमाती महिला असे प्रवर्गनिहाय आरक्षण सुटले आहे. यासाठी ९ सप्टेंबर रोजी तहसीलदार हे निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार आहेत. तर १५ ते २२ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४.३० पर्यंत उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र मागविण्यात येणार आहेत. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून छाननी तर २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र उमेदवरांना माघे घेता येणार आहेत. निवडणूक लढविणाºया उमेदवारांना निवडणूक चिन्ह दिले जाणार आहे. ७ आॅक्टोबर रोजी निवडणूक आणि ९ आॅक्टोबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे.