१६ उमेदवारांचे आक्षेप अर्ज दाखल

By Admin | Updated: April 14, 2015 00:55 IST2015-04-14T00:55:01+5:302015-04-14T00:55:01+5:30

औरंगाबाद : येत्या ५ मे रोजी होणाऱ्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या छाननीत बाद झालेल्या १६ उमेदवारांनी आक्षेप अर्ज सादर केले.

16 candidates file nominations | १६ उमेदवारांचे आक्षेप अर्ज दाखल

१६ उमेदवारांचे आक्षेप अर्ज दाखल


औरंगाबाद : येत्या ५ मे रोजी होणाऱ्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या छाननीत बाद झालेल्या १६ उमेदवारांनी आक्षेप अर्ज सादर केले. त्यांची नावे अशी- आगाजी लक्ष्मण अंभोरे, जयप्रकाश जयशंकर चव्हाण, सुनीता विलासराव चव्हाण, रावसाहेब यादवराव वाघचौरे, संजय जगन्नाथ कांजुणे, कैलास रामराव पाटील, भागीनाथ शहादराव मगर, शहानवाज खान अब्दुल रहमान खान, मंगला अनंतराव वाहेगावकर, रघुवीर संजय बेडवाल, शेषराव बाबूराव जाधव, महेंद्र रमंडलाल पांडे, किशोर कारभारी धनायत, शेषराव भाऊराव जाधव, अंबादास भाऊराव मानकापे व इंदुमती साहेबराव
पाटील.
येत्या १६ एप्रिल रोजी या सर्वांची सुनावणी ठेवण्यात आली आहे. दुपारी १२.३० ते कामकाज संपेपर्यंत ही सुनावणी चालेल. २४ एप्रिलपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल; परंतु अद्याप कुणीही माघार घेतली नाही.
२७ एप्रिलला चिन्हांचे वाटप करण्यात येईल. ५ मे रोजी मतदान झाल्यानंतर ७ मे रोजी निकाल जाहीर होईल.

Web Title: 16 candidates file nominations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.