१५८२ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
By Admin | Updated: May 9, 2014 00:24 IST2014-05-09T00:24:32+5:302014-05-09T00:24:54+5:30
हिंगोली : महाराष्टÑ राज्य शिक्षण व संशोधन संचालनालयातर्फे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी आयोजित एमएच-सीईटी परीक्षा गुरूवारी शहरातील सात केंद्रांवर घेण्यात आली.

१५८२ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
हिंगोली : महाराष्टÑ राज्य शिक्षण व संशोधन संचालनालयातर्फे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी आयोजित एमएच-सीईटी परीक्षा गुरूवारी शहरातील सात केंद्रांवर घेण्यात आली. या परिक्षेसाठी १ हजार ६१९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार ५८२ जण उपस्थित राहिले तर ३७ विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. महाराष्टÑात एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस, बीएस्सी नर्सींग आदी अभ्यासकमांना प्रवेश घेण्यासाठी एमएच-सीईटी ही परीक्षा अनिवार्य आहे. या परिक्षेसाठी हिंगोली शहरातील आदर्श महाविद्यालयात दोन केंद्र स्थापन करण्यात आले होते. एका केंद्रावर ३६० पैकी ३५२ तर दुसर्या केंद्रावर ३६० पैकी ३५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सरजुदेवी भिकुलाल भारुका विद्यालयातील केंद्रावर २४० पैकी २३५, सेक्रेड हार्ट इंग्लिश स्कुलमधील केंद्रावर २४० पैकी २३६, खुराणा- सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केंद्रावर १९२ पैकी १८८, शिवाजी महाविद्यालयाच्या केंद्रावर १९२ पैकी १८३ आणि खाकीबाबा इंग्लिश स्कुलमधील केंद्रावर ३५ पैकी ३४ विद्यार्थ्यांनी एमएच- सीईटी परीक्षा दिली. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने विशेष तयारी केली होती. परीक्षा केंद्राच्या परिसरात पोलिस बंदोबस्तही लावण्यात आला होता. (प्रतिनिधी)