१५७ कारखान्यांकडे सव्वा कोटीचा कर थकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 18:58 IST2018-12-22T18:58:29+5:302018-12-22T18:58:40+5:30
घाणेगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या १५७ कारखान्यांकडे जवळपास सव्वा कोटीचा कर थकल्यामुळे गावातील विकास कामे रखडली आहेत. त्यामुळे थकीत कराच्या वसुलीसाठी जप्तीची मोहिम राबविण्याचा निर्णय शुक्रवारी ग्रामसभेत घेण्यात आला.

१५७ कारखान्यांकडे सव्वा कोटीचा कर थकला
वाळूज महानगर : घाणेगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या १५७ कारखान्यांकडे जवळपास सव्वा कोटीचा कर थकल्यामुळे गावातील विकास कामे रखडली आहेत. त्यामुळे थकीत कराच्या वसुलीसाठी जप्तीची मोहिम राबविण्याचा निर्णय शुक्रवारी ग्रामसभेत घेण्यात आला.
घाणेगाव येथे झालेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिभा गायके तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य श्याम बनसोडे, पं.स.सदस्य सावळीराम थोरात, ग्रामविकास अधिकारी बी.बी.गव्हाणे, उपसरपंच रामकिसन म्हस्के उपस्थित होते. सभेत कारखान्यांकडे कर थकल्यामुळे विकास कामे रखडत असल्याची तक्रार पदाधिकारी व ग्रामस्थांनी केली. ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाºया २३९ पैकी ८२ कारखान्यांनी कराचा भरणा केलेला आहे. मात्र, उर्वरित १५७ कारखान्यांकडे जवळपास सव्वा कोटींचा कर थकीत आहे. याच्या वसुलीसाठी ग्रामपंचायतीकडून आठवडाभरापूर्वी कारखानदारांना नोटिसा बजावलेल्या आहेत. मात्र, याला प्रतिसाद मिळत नसल्याने जप्तीची कारवाई राबविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.
तसेच विविध विषयांवर चर्चा करुन विकामकामांचे नियोजन करण्यात आले. विटावा व घाणेगावातील स्मशानभूमीची दूरुस्ती करणे, जमा खर्चास मंजुरी देणे, मंजूर असलेल्या ठरावाची अमंलबजावणी करणे आदींवर चर्चा झाली.
लाभार्थ्यांना धनादेश वाटप
कार्यक्रमात स्वच्छतागृह उभारणाºया ७२ लाभार्थ्यांना प्रत्येकी १२ हजार या प्रमाणे ८ लाख ६४ हजार रुपयांचे धनादेश तसेच मनरेगाच्या ७ लाभार्थ्यांनाही धनादेश देण्यात आले. या प्रसंगी सदस्य केशव गायके, वंदना गायकवाड, कावेरी मुदीराज, दुर्गा दुबे, मिना काळवणे, सुमनबाई गव्हाणे, विजय शुक्ला, विद्या माळी, जगन्नाथ गायकडे, सुरेश गायकवाड, उत्तप्रसाद दुबे, संतोष गायकवाड, काकासाहेब बनकर, कैलास गायके, सोपान सातपुते,सुदाम बनकर आदींची उपस्थिती होती.