निवडणूक आखाड्यात उरले १५६ उमेदवार
By Admin | Updated: October 2, 2014 01:21 IST2014-10-02T01:18:55+5:302014-10-02T01:21:42+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमधील २८३ उमेदवारांपैकी तब्बल १२७ जणांनी त्यांचे अर्ज मागे घेतले.

निवडणूक आखाड्यात उरले १५६ उमेदवार
औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमधील २८३ उमेदवारांपैकी तब्बल १२७ जणांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता सर्व मतदारसंघांमध्ये मिळून निवडणूक रिंगणात १५६ उमेदवार उरले आहेत. सर्वाधिक ३० उमेदवार औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आहेत, तर सर्वांत कमी १२ उमेदवार कन्नड मतदारसंघात आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. नऊ मतदारसंघांमध्ये एकूण ३१९ जणांचे उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननीत त्यापैकी ३६ जणांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे छाननीनंतर रिंगणात २८३ उमेदवार उरले होते.
मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत यापैकी १२७ जणांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता १५६ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. सिल्लोड मतदारसंघात २५ पैकी ९ जणांनी माघार घेतली.
तेथे आता १६ उमेदवार उरले आहेत. कन्नड मतदारसंघातही २० पैकी ८ जणांनी माघार घेतली. फुलंब्री मतदारसंघात २१ पैकी ८ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. औरंगाबाद मध्य मतदारसंघात सर्वाधिक २६ जणांनी माघार घेतली. तरीही तेथे १८ उमेदवार रिंगणात उरले आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात २९ पैकी ११ जणांनी, औरंगाबाद पूर्व मतदारसंघात ५० पैकी २० जणांनी, पैठण मतदारसंघात ४१ पैकी २२ जणांनी, गंगापूर मतदारसंघात ३५ पैकी १८ जणांनी आणि वैजापूर मतदारसंघात १८ पैकी ५ जणांनी माघार घेतली.