मुलींसाठी दीडशेच्या वर खाजगी वसतिगृहे
By Admin | Updated: May 29, 2014 01:15 IST2014-05-29T01:10:56+5:302014-05-29T01:15:13+5:30
औरंगाबाद : शहर आणि परिसरात शिक्षणाचे क्षेत्र विस्तारत असून विविध संस्था दाखल होत आहेत.

मुलींसाठी दीडशेच्या वर खाजगी वसतिगृहे
औरंगाबाद : शहर आणि परिसरात शिक्षणाचे क्षेत्र विस्तारत असून विविध संस्था दाखल होत आहेत. यामुळे परगावाहून आणि परराज्यांतून शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थिनींच्या सोयीसाठी खाजगी आणि घरगुती वसतिगृहांची संख्या वाढत आहेत. असे असले तरी विद्यार्थिनींसाठी वसतिगृहांची संख्या अपुरी पडत आहे. शहरात मुलींसाठी ९ शासकीय वसतिगृहे आहेत, तर जवळपास १५० खाजगी वसतिगृहे आहेत. यात घरगुती वसतिगृहांचे प्रमाण जास्त आहे. घरगुती वसतिगृहांत राहण्याकडे मुलींचा आणि पालकांचा कल असतो. हे गृहित धरुन शहरातील अनेक कुटुंबियांनी आपल्या अतिरिक्त निवासस्थानात किंवा फ्लॅटमध्ये मुलींसाठी वसतिगृहे सुरु केली आहेत. तरीही ही संख्या अपुरी पडत आहेत. मुलींच्या वसतिगृहांची संख्या विभागवसतिगृह संख्या विद्यार्थी संख्या समाजकल्याण ३ ४२५ आदिवासी विकास प्रकल्प विभाग २ २५३ डॉ. बा. आं. मराठवाडा विद्यापीठ ४ ३५० एकूण ९ १०२८ बहुतेक महाविद्यालयांची स्वत:ची वसतिगृहे शहरातील बहुतेक खासगी महाविद्यालयांनी स्वत:ची वसतिगृहे बांधली आहेत. शासकीय वसतिगृहांची विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची क्षमता संपताच विद्यार्थ्यांना खाजगी वसतिगृहाचा पर्याय शोधावा लागतो. येथे आहेत मुलींची वसतिगृहे विद्यापीठ परिसरात चार, समाजकल्याण विभागाची पदमपुर्यात २ आणि समर्थनगर येथे एक. आदिवासी विकास प्रकल्पाची मुलींसाठी ज्युबिली पार्क व ठाकरे नगर (एन-२) येथे एक एक.