शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

१५० कोटींच्या निविदा उघडताच धमाका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:57 IST

शहरातील तब्बल ५२ रस्ते सिमेंटने गुळगुळीत करण्यासाठी महापालिकेत निविदा प्रक्रिया सुरू होती. सोमवारी निविदा उघडताच जोरदार धमाका झाला. पुण्याच्या एका कंत्राटदाराने अंदाजपत्रकीय रकमेपेक्षाही कमी दराने निविदा भरून मोठ-मोठ्या कंत्राटदारांना धोबीपछाड दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील तब्बल ५२ रस्ते सिमेंटने गुळगुळीत करण्यासाठी महापालिकेत निविदा प्रक्रिया सुरू होती. सोमवारी निविदा उघडताच जोरदार धमाका झाला. पुण्याच्या एका कंत्राटदाराने अंदाजपत्रकीय रकमेपेक्षाही कमी दराने निविदा भरून मोठ-मोठ्या कंत्राटदारांना धोबीपछाड दिली आहे. शहरातील सर्व कंत्राटदारांनी मिळून रिंग पद्धतीने निविदा २२ टक्के अधिक दराने दाखल केल्या होत्या. यातील एकालाही काम मिळालेले नाही, त्यामुळे कंत्राटदार आणि त्यांचे समर्थक प्रशासनावर दबाव टाकत आहेत.राज्य शासनाने सहा महिन्यांपूर्वी शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर केला. या कामांसोबतच महापालिकेने डिफर पेमेंट पद्धतीवर आणखी ५० कोटींची कामे करण्याचा निर्णय घेतला. १०० कोटींची कामे घेणा-या कंत्राटदारांनीच डिफर पेमेंटची कामेही करून द्यावीत, अशी अट टाकण्यात आली. १५० कोटींच्या निविदा प्रसिद्धीचे काम तीन महिन्यांपासून सुरू आहे. अनेकदा यात विघ्न आले. पहिल्यांदा निविदा प्रसिद्ध केल्या. त्यात सोयीचे कंत्राटदार न आल्याने निविदा प्रक्रियेला एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. १ फेब्रुवारीला मुदत संपली. त्यानंतर निविदा उघडण्यास मनपाकडून टाळाटाळ करण्यात येत होती. सोमवारी मुहूर्त शोधून निविदा उघडण्यात आल्या. निविदा प्रक्रियेचा तपशील पाहून अनेकांच्या पायाखालची वाळूच घसरली. कंत्राटदार, समर्थक, पदाधिकारीही हवालदिल झाले. पुण्याच्या एका कंत्राटदाराने कमी दराने निविदा टाकून १५० कोटींची कामे आपणच करणार, असा दावा केला. ज्या कंत्राटदारांनी रिंग करून २२ टक्के अधिक दराने निविदा दाखल केल्या होत्या, त्यांची मोठी गोची झाली. रिंग पद्धतीत सर्व स्थानिक कंत्राटदारांनी आपसात कामे वाटून घेतली होती. पुण्याच्या संस्थेला फक्त ५ कोटींची कामे देण्याचे ठरविले होते. त्यांनी नकार देत सर्वांना निविदा प्रक्रियेत मात दिली.कटकारस्थानाला सुरुवातपुण्याच्या ज्या संस्थेने हे काम मिळविले आहे, त्या कंत्राटदाराने महापालिकेच्या सर्व अटी, शर्थींची पूर्तता केली आहे. या कंत्राटदाराला तांत्रिकरीत्या अडकविण्यात यावे.अनामत रक्कम प्रत्येक निविदेसाठी वेगळी का भरली नाही, असे तांत्रिक मुद्दे उपस्थित करून त्याला बाद करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत निविदा पुन्हा प्रसिद्ध करावी, मर्जीतील कंत्राटदारांना कामे मिळवून देण्यासाठी एक गट सरसावला आहे. या गटाने प्रशासनावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.वाद न्यायालयातजाण्याची शक्यतानिविदा प्रक्रियेत गडबड करून सोयीच्या कंत्राटदारांची वर्णी लावण्याचा प्रयत्न प्रशासनाने केल्यास वाद न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.१५० कोटी रुपयांची कामे मिळविण्यासाठी काही कंत्राटदार न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत. न्यायालयाचे आदेश मिळवून काम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबतच्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे व न्या. एस. एम. गव्हाणे यांच्यासमोर सोमवारी (दि.५ फेब्रुवारी) सुनावणी झाली. या याचिकेवर आता २३ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीवेळी शहरातील मुख्य रस्ता आणि अंतर्गत १९ रस्त्यांवरील खड्डे महानगरपालिका आणि संबंधित विभागाने २० नोव्हेंबरपर्यंत बुजवावेत आणि क्रांतीचौक उड्डाणपुलाचा वाद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांनी मिटवावा, तसेच शहरातील तीन पुलांचे काम कधीपासून सुरू करणार याचे शपथपत्र दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते.उच्च न्यायालयात पार्टी इन पर्सन अ‍ॅड. रूपेश जैस्वाल यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. मागील सुनावणीवेळी पालिकेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रामध्ये शहरातील १९ रस्त्यांची निविदा काढण्यात आली होती.या रस्त्यापैकी १७ रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचे व हॉटमिक्स प्लांट मनपाला सुरू करणे शक्य नसल्याचे म्हटले होते, तर रस्ते विकास महामंडळाच्या वतीने नगर नाका ते केंब्रिज शाळा, बीड बायपास झाल्टा फाटा ते महानुभाव आश्रम असा २९ कि. मी. रस्ता आणि मुकुंदवाडी, देवळाई चौकात उड्डाणपूल बनविण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यालयाकडे ७८९ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते.