शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंधातून १५ वर्षीय प्रेयसी चार महिन्यांची गर्भवती; अल्पवयीन प्रियकर पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 16:22 IST

गर्भवती असल्याचे समजताच पीडितेने फोडला टाहो; वाळूज परिसरातील खळबळजनक घटना.

वाळूज महानगर: प्रेमसंबंधातून १५ वर्षीय प्रेयसी गर्भवती झाल्याची खळबळजनक घटना वाळूज परिसरात उघडकीस आली आहे. पोटदुखीचा त्रास होत असल्याने आईने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून १८ वर्षीय प्रियकराचा पोलीसांकडून शोध सुरु आहे.

दिक्षा (१५, नाव बदलले आहे) ही आई व लहान भावासोबत वाळूज परिसरात वास्तव्यास आहे. दिक्षा हिच्या आई-वडिलांचे आपसात पटत नसल्याने ते दोघेही विभक्त राहतात. कंपनीत काम करून दोन्ही मुलांचा सांभाळ आई करते. दोन वर्षापूर्वी दिक्षाची ओळख एकाच शाळेत असणाऱ्या गल्लीतील नितीन (१८, नाव बदलले आहे) याच्यासोबत झाली. या ओळखीतून दोघांची मैत्रीझाली अन् सोशलमिडियाच्या चॅटिंगनंतर एकमेकांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या.

दरम्यान, आई कंपनीत कामाला गेल्यावर नितीन हा घरी एकट्या असलेल्या दिक्षाला भेटण्यासाठी येत असे. प्रेमात आकंठ बुडालेले दोघेही घरी कोणी नसताना सतत एकमेकांना भेटत होते. काही दिवसांपूर्वी नितीने दीक्षासोबत शारिरीक संबध प्रस्थापित केले. यानंतर अनेकवेळा नितीनने दिक्षावर घरी जाऊन अत्याचार केला. पोटदुखीचा त्रास झाल्याने दवाखान्यात गेल्यास दीक्षा चार महिन्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी दिक्षा हिच्या तक्रारीवरुन नितीन याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे या करीत आहेत. 

मुल नको, म्हणत फोडला टाहोदरम्यान, दिक्षाचे पोट दुखत असल्याने आईने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी दिक्षा चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगताच आईला मोठा धक्का बसला. आईने विश्वासात घेऊन चौकशी केली असता दीक्षाने घरी कोणी नसताना नितीने अत्याचार केल्याचे सांगितले. अत्याचारामुळे गर्भधारणा राहिल्याचे लक्षात येताच दीक्षाने टाहो फोडला. अजाणतेपणात चूक झाली, मुल नको, अशी विनवणी ती आईकडे करू लागली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद