शहरात दीड हजार कोटींचा डेव्हलपमेंट ट्रँगल!
By Admin | Updated: August 20, 2014 00:57 IST2014-08-20T00:39:47+5:302014-08-20T00:57:12+5:30
विकास राऊत, औरंगाबाद शहरासाठी २०१४ हे साल भाग्यदायी ठरले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून शहरात एक- दोन नव्हे तर तब्बल दीड हजार कोटींच्या विकासकामांची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे.

शहरात दीड हजार कोटींचा डेव्हलपमेंट ट्रँगल!
विकास राऊत, औरंगाबाद
शहरासाठी २०१४ हे साल भाग्यदायी ठरले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून शहरात एक- दोन नव्हे तर तब्बल दीड हजार कोटींच्या विकासकामांची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. पायाभूत सेवा- सुविधांची ती कामे असून पाणीपुरवठा, रस्त्यांच्या कामाचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. ही कामे आगामी काळात पूर्ण झाल्यास शहराच्या वाहतुकीचा आणि पाण्याचा, ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लागणार आहे. केंद्र शासन, राज्य शासन निधीतील ती कामे आहेत.
केंद्र शासनाने दिलेल्या निधीतून समांतर जलवाहिनी आणि भुयारी गटार या दोन महत्त्वपूर्ण योजनेसह शहरातील रस्त्यांची उड्डाणपुलांची कामे होत आहेत. समांतर जलवाहिनीच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. १ सप्टेंबरपासून या योजनेचे काम सुरू होणार असून आगामी तीन वर्षांत शहराला या योजनेअंतर्गत पाणी मिळणार आहे. समांतर जलवाहिनीसाठी केंद्र आणि राज्याने २०११ सालीच १६२ कोटींचा निधी दिला आहे. या निधीवर तब्बल ६० कोटींचे व्याज आता जमा झाले आहे.
औरंगाबादचा चेहरा-मोहरा बदलणाऱ्या भूमिगत गटार योजनेची वर्कआॅर्डर दिली आहे. ४६४ कोटी खर्चून तीन वर्षांत ही योजना पूर्ण केली जाईल. तब्बल ८० टक्के अनुदान शासनाचे असून राज्य शासन आणि पालिकेला प्रत्येकी दहा टक्के रक्कम उभारायची आहे. शहरात सार्वजनिक बांधकाम आणि मनपाच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत, तसेच सिडको बसस्थानक ते रामगिरी आणि अमरप्रीत ते मोंढा नाका, महावीर चौक या उड्डाणपुलाचे कामही सुरू झाले आहे.