१५ हजार कोटींच्या कामांचे आज गडकरींच्या हस्ते भूमिपूजन

By Admin | Updated: December 25, 2015 00:06 IST2015-12-24T23:43:53+5:302015-12-25T00:06:47+5:30

औरंगाबाद : औरंगाबाद शहराला गोल्डन ट्रान्सपोर्ट ट्रँगलमध्ये आणण्यासाठी १५ हजार ७०६ कोटी रुपयांचा नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम (एनएचडीपी) तयार करण्यात आला

15 thousand crores of work today Bhatiputjan at the hands of Gadkari | १५ हजार कोटींच्या कामांचे आज गडकरींच्या हस्ते भूमिपूजन

१५ हजार कोटींच्या कामांचे आज गडकरींच्या हस्ते भूमिपूजन

औरंगाबाद : औरंगाबाद शहराला गोल्डन ट्रान्सपोर्ट ट्रँगलमध्ये आणण्यासाठी १५ हजार ७०६ कोटी रुपयांचा नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम (एनएचडीपी) तयार करण्यात आला असून, त्याचे भूमिपूजन उद्या २५ डिसेंबर रोजी केंद्रीय रस्ते, वाहतूक, महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होत आहे.
चिकलठाणा येथील केम्ब्रिज शाळेजवळ सायंकाळी ४.३० वाजता हा भूमिपूजन समारंभ होणार आहे. या समारंभाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह इतरही काही मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
देशभरात वाहतूक विकासासाठी ७ फेसचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यातील ३ टप्पे पूर्ण झाले असून, चौथ्या टप्प्यात औरंगाबाद व सीआरएफ (सेंट्रल रोड फंड वर्क्स)च्या रस्ते विकासाला प्रारंभ होईल. सीआरएफमधील रस्ते राज्य बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात येतील, तर एनएचएआय (नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया) यांच्याकडे एनएचडीपीअंतर्गत निर्माण होणाऱ्या रस्त्यांचे नियंत्रण राहणार आहे.
जालना रोड सध्या सहापदरी असून, त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. येडशी- औरंगाबाद- धुळे महामार्गाच्या कामातच ९ कि़मी. अंतराच्या जालना रोडचे काँक्रिटीकरण होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ औरंगाबाद शहर चौपदरीकरण येडशी ते औरंगाबाद ते धुळे आणि इतर रस्त्यांचे एकत्रित भूमिपूजन करण्यात येणार आहे.
त्यामुळे भूमिपूजन रस्त्यांच्या यादीत औरंगाबाद शहरातील जालना रोडच्या कामाचा स्वतंत्र उल्लेख नाही. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन याविषयी सविस्तर माहिती दिली. पत्रकार परिषदेला आ. अतुल सावे, पक्षाचे प्रवक्ते शिरीष बोराळकर, महिला मोर्चाच्या विजया रहाटकर, डॉ. भागवत कराड, सभापती दिलीप थोरात आदींची उपस्थिती होती.

Web Title: 15 thousand crores of work today Bhatiputjan at the hands of Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.