शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

१५ कारणे दाखवा नोटिसांना ‘नो रिस्पॉन्स’

By admin | Updated: July 12, 2014 01:01 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शिक्षण विभागाचे सदस्यांनी अक्षरश: वाभाडे काढले.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शिक्षण विभागाचे सदस्यांनी अक्षरश: वाभाडे काढले. शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांना प्रशासनाने तब्बल १५ कारणे दाखवा नोटिसा बजावल्या; परंतु त्यापैकी एकाही नोटिसीचे उत्तर त्यांनी दिले नाही, असा आरोप सदस्यांनी केला. परंतु प्रशासनाने केवळ तीन नोटिसा बजावल्याचे सांगितले. जि. प. अध्यक्षा शारदा जारवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली. शिक्षणाधिकारी नितीन उपासनी बैठकांना उपस्थित राहत नाहीत, नोटिसीचे उत्तर देत नाहीत, संचिका दाबून ठेवतात, असा आरोप सदस्य रामदास पालोदकर यांनी केला. तेव्हा उपासनी सभागृहात नव्हते. त्यामुळे उपासनी यांना तात्काळ सभागृहात बोलावण्यात आले. वस्तीशाळांच्या निमशिक्षकांना नियमित करण्याची संचिका का दाबून ठेवण्यात आली, असा थेट प्रश्न त्यांना सदस्यांनी विचारला . तेव्हा उपासनी म्हणाले, एप्रिलपर्यंत ती संचिका माझ्याकडे होती. ती मी फायनलही केली होती. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्याचा पदभार विभागून एम. के. देशमुख यांना देण्यात आला. त्यामुळे त्या संचिकेविषयी त्यांनाच विचारा. देशमुख यांनी सदर संचिकेचा प्रवास सांगितला व पुढील आठ दिवसांत सदर संचिका निकाली काढण्याचे आश्वासन दिले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके यांनी सभागृहाला सांगितले की, उपासनी यांना केवळ तीन नोटिसा बजावण्यात आल्या आहेत; परंतु त्यापैकी एकाही नोटीसचे उत्तर त्यांनी दिले नाही. २८५ शाळांना मान्यताच नाहीखाजगी अनुदानित शाळांना १० निकष पाळण्याचे सांगण्यात आले आहे. किती शाळांनी हे निकष पूर्ण केले, असा प्रश्न दीपक राजपूत यांनी केला. या शाळांनी भरून दिलेल्या सोयी-सुविधांची तपासणी शिक्षण विभागाने करून ५४४ शाळांना मान्यता दिली; परंतु मागील तीन वर्षांत २८५ शाळांनी ही माहिती भरून दिली नाही व मान्यताही घेतली नाही. आता या शाळांना ३० सप्टेंबरची मुदत दिली असून, त्यानंतर नोटिसा देण्यात येतील.सातारा, देवळाई नगर परिषदांना मंजुरीसातारा व देवळाई या गावांत नगर परिषदा स्थापन करण्यास मंजुरी देणाऱ्या ठरावास स्थायी समितीने एकमुखाने आज मंजुरी दिली. निमशिक्षक झाले नियमितवस्तीशाळा निमशिक्षकांना नियमित करण्याचा मुद्दा गेले अनेक दिवस गाजत होता. स्थायी समितीची सभा सुरू असताना या शिक्षकांनी बाहेर धरणे आंदोलन सुरू केले होते. सभापती डॉ. सुनील शिंदे यांनी त्या शिक्षकांचा मुद्दा लावून धरला. त्यामुळे सीईओंनी ५७२ शिक्षकांना नियमित करण्याच्या संचिकेवर स्वाक्षऱ्या केल्या. उपाध्यक्षा विजया निकम, समाजकल्याण सभापती रामनाथ चोरमले, शिक्षण सभापती बबन कुंडारे, रामदास पालोदकर यांनी आंदोलनस्थळी जाऊन शिक्षकांचे आंदोलन मागे घेण्याची शिष्टाई केली.