्नइतवारा बाजारातून १५ मोबाईल लंपास

By Admin | Updated: July 7, 2014 00:20 IST2014-07-07T00:08:17+5:302014-07-07T00:20:32+5:30

नांदेड : शहरातील इतवारा भागात भरणाऱ्या रविवारच्या बाजारातून महागडे तब्बल पंधरा मोबाईल चोरी गेल्याची घटना घडली आहे़ त्यामुळे इतवारा पोलिस नेमके करताहेत काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे़

15 mobile lamps from the market | ्नइतवारा बाजारातून १५ मोबाईल लंपास

्नइतवारा बाजारातून १५ मोबाईल लंपास

नांदेड : शहरातील इतवारा भागात भरणाऱ्या रविवारच्या बाजारातून महागडे तब्बल पंधरा मोबाईल चोरी गेल्याची घटना घडली आहे़ त्यामुळे इतवारा पोलिस नेमके करताहेत काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे़
इतवारा भागात मटका, अवैध धंदे सध्या जोमात सुरु आहेत़ अनेक जुगार अड्डेही आहेत़ त्यात गुटख्याची छुप्या मार्गाने याच भागात शहरातील इतर भागात पुरवठा केला जातो़ त्यात यावर आळा घालण्याची जबाबदारी असलेले डीबीचे पथक मात्र दुसऱ्याच कामात मश्गुल आहे़ रविवारी इतवारा भागात भरलेल्या बाजारातून तब्बल पंधरा मोबाईल चोरट्यांनी लंपास केले़ विशेष म्हणजे या बाजारात डीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी गस्त घालणे आवश्यक असते़ परंतु त्यांचे याकडे साफ दुर्लक्ष होते़ त्यामुळे चोरट्यांचे फावते़ दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हे न नोंदविता़ मोबाईल चोरीची प्रकरणे केवळ चौकशीवर ठेवण्यात येतात़ चोरीला गेलेले हे मोबाईल महागडे असल्याचे एका तक्रारकर्त्याने सांगितले़
यापूर्वी इतवारा भागात अनेक चोरी, लुटमारीच्या घटना घडल्या आहेत़ त्याच्या तपासाबाबत मात्र कुठलीच पावले उचलण्यात येत नाहीत़ डीबी पथका असलेले कर्मचारी तर नेमके कुठे कर्तव्यावर असतात असा प्रश्न निर्माण होतो़ या सर्व प्रकरणांकडे पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे़

Web Title: 15 mobile lamps from the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.