१५ मिनिटांत संसार उघड्यावर!
By Admin | Updated: October 19, 2014 00:20 IST2014-10-19T00:05:45+5:302014-10-19T00:20:49+5:30
उस्मानाबाद : सायंकाळचा वेऴ़़ महिलांची घरातील कामकाजाची सुरू असलेली लगबग़़ शेतातील मजूर, शेतकऱ्यांना घराकडे येण्याची लागलेली ओढ़़

१५ मिनिटांत संसार उघड्यावर!
उस्मानाबाद : सायंकाळचा वेऴ़़ महिलांची घरातील कामकाजाची सुरू असलेली लगबग़़ शेतातील मजूर, शेतकऱ्यांना घराकडे येण्याची लागलेली ओढ़़ आणि त्यातच वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात बरसलेल्या पावसात कोंडकरांचा संसार उघड्यावर आला़ केवळ १५ मिनिटेच हा प्रकार घडला असून, निसर्गाच्या कोपानंतर उन्मळलेली झाडे, घरांवरील उडालेली पत्रे, संसारोपयोगी वस्तूचे झालेले नुकसान पाहून प्रत्येकजण हतबल झाला होता़ निसर्गाच्या या प्रकोपाचा थरकाप उडविणारा प्रसंग कोंड (ता़उस्मानाबाद) येथील ग्रामस्थांना शुक्रवारी सायंकाळी अनुभवास आला़
उस्मानाबाद तालुक्यातील कोंडसह परिसरात शुक्रवारी सायंकाळी ५़३० ते ५़४५ वाजण्याच्या दरम्यान अचानकच वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला़ अचानक ओढावलेल्या या प्रसंगामुळे घरात कामकाज करणाऱ्या महिला, चौकात थांबलेले ग्रामस्थ, शेतातून परतणारे आणि शेतात काम करणाऱ्या शेतकरी, मजुरांची मोठी तारांबळ उडाली़ पावसापेक्षा वादळी वाऱ्यामुळे केवळ १५ मिनिटांतच अनेकांचा संसार उघड्यावर आला़ क्षणार्धात वाऱ्याने केलेले नुकसान पाहता अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते़ यात घटनेत गोरोबा जमादा, दगडू लोंढे यांच्या घरावर झाड पडल्याने संसारोपयोगी साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे़ तसेच लक्ष्मी गणपती करडे (वय-७५), गयाबाई दगडू लोंढे, रतनबाई सुरतसिंग तिवारी या तीन महिला घरावरील पत्रे उडाल्याने दगड पडून जखमी झाल्या आहेत़ तसेच बाजीराव कोळी, बालाजी जमादार, सुधाकर जमादार, सोमनाथ जमादार, हमीद मुलाणी, विश्वंभर जाधव, सय्यद शेख, पांडुरंग भोसले यांच्यासह जवळपास ३० जणांच्या घरावरील पत्रे उडून गेली आहेत़ वाऱ्याचा जोर इतका होता की एक पत्रा विद्युत वाहिनीच्या पोलवर जावून अडकला होता़ या वादळी वाऱ्याचा प्राथमिक आरोग्य केंद्रालाही फटका बसला असून, इमारतीवरील सोलार यंत्रणा आणि सिंटॅक्स टाक्या पडल्याने नुकसान झाले़ तसेच इतर ग्रामस्थांनाही या वादळी वाऱ्यामुळे नुकसान सहन करावे लागले आहे़ या घटनेनंतर शनिवारी सकाळी तलाठी श्रीनिवास पवार, ग्रामसेवक लिंबराज सुरवसे यांनी घरोघरी जावून पंचनामा केला़ यावेळी सरपंच इमामबी मुलाणी, ग्रापं सदस्या पद्मिणबाई भोसले, कमल भोसले, चेअरमन सुधाकर रोडगे, धर्मराज घाडगे आदीची उपस्थिती होती़